शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Death Case: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी सुशांतच्या बहिणीचं ट्विट; श्रीकृष्ण-अर्जुनाचा फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 10:01 IST

Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता

नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास नेमका कोणी करायचा, याबद्दल न्यायालय आजच निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुशांतचे कुटुंबीय आणि चाहते यांचं लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागलं आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे. न्यायालयाच्या निकालाआधी सुशांतची बहिण श्वेतानं महाभारतामधील एक फोटो ट्विट केला आहे. देव आमच्यासोबत आहे, असं श्वेता यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास नेमका कुणी करायचा याबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीनं हा तपास मुंबई पोलिसांकडूनच करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासाची मागणी लावून धरली आहे. सुशांतची बहिण श्वेता यांनी ट्विट केलेल्या फोटोत श्रीकृष्ण रथाचं सारथ्य करताना, तर अर्जुन धनुष्यबाण चालवत असताना दिसत आहे. 'आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे न्या. शरणागती', असं श्वेता यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटण्यात एफआयआर दाखल केला. त्यानंतर बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी दाखल झाले. बिहार सरकारनं सीबीआयची चौकशीची मागणी केल्यानंतक सीबीआयनंदेखील तपास सुरू केला. मात्र महाराष्ट्र सरकारनं याला विरोध दर्शवला. मुंबई पोलीस तपास करण्यास सक्षम असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवलासर्वोच्च न्यायालयानं मागील सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले. रिया चक्रवर्तीचे वकील श्याम दिवाण, बिहार सरकारचे वकील मनिंदर सिंह, महाराष्ट्र सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी, सुशांतचे वडिलांचे वकील विकास सिंह, केंद्र सरकार महाधिवक्ते तुषार मेहता यांच्या बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला.अखेर मंत्री आदित्य ठाकरेंबद्दल रिया चक्रवर्तीनं मौन सोडलं; म्हणाली...मौन हा माझा कमकुवतपणा नाही; सत्य बदलत नाही- रिया चक्रवर्ती...तर सीबीआय चौकशी करावी; सुशांत प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याची शिवसेनेविरोधात भूमिकासीबीआय की पोलीस? आज फैसला, न्यायालय निर्णय देणार

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय