शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 11:24 IST

Sushant Singh Rajput Case SC Order CBI Investigation: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र सरकारनं सहकार्य करावं. भविष्यात सर्वोच्च न्यायालयानं सुशांतशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आपल्या हाती घ्यावा, अशी सूचना न्यायालयानं केली. 'सीबीआय केवळ पाटण्यातील एफआयआरचा तपास करण्यासच सक्षम नाही, तर या प्रकरणाशी संबंधित आणखी गुन्हे दाखल झाल्यास त्यांचा तपासदेखील सीबीआय करेल,' असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं.सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा अधिकार नेमका कोणाला, यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार होतं. सर्वोच्च न्यायालयानं सर्व पक्षकारांकडून लिखित उत्तरं मागवली होती. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले. रिया चक्रवर्तीचे वकील श्याम दिवाण, बिहार सरकारचे वकील मनिंदर सिंह, महाराष्ट्र सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी, सुशांतचे वडिलांचे वकील विकास सिंह, केंद्र सरकार महाधिवक्ते तुषार मेहता यांच्या बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती