शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

...म्हणून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास अद्याप अपूर्ण; सीबीआयनं सांगितलं कारण

By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 5:45 PM

Sushant Singh Rajput Death Case: सीबीआयनं पीएमओला पाठवलेला तपासाचा स्टेटस रिपोर्ट

नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही. सहा महिन्यांपूर्वी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आढळून आला. सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर सीबीआयनं प्रकरणाचा तपास हाती घेतला. मात्र तब्बल १४५ दिवसांनंतरही सीबीआयच्या हाती ठोस असं काहीही हाती लागलेलं नाही. या प्रकरणाचे सर्व पैलू लक्षात घेऊन तपास सुरू असून कोणतीही शक्यता नाकारता येत नसल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे.भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) पत्र लिहून सुशांत प्रकरणाच्या तपासाची माहिती मागितली होती. त्यानंतर सीबीआयनं पीएमओला पत्र लिहून तपासाबद्दलची माहिती दिली. 'केंद्रीय तपास यंत्रणा अतिशय सखोलपणे प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यासाठी आधुनिक वैज्ञानिक तंत्राचा वापर केला जात आहे. तपासादरम्यान मृत्यूच्या सर्व पैलूंचा विचार करण्यात येत आहे. कोणतीही शक्यता नाकारण्यात आलेली नाही,' अशी माहिती सीबीआयनं स्वामी यांना आज दिली.'तपासादरम्यान मोबाईल फॉरेन्सिक उपकरणांच्या मदतीनं डिजिटल उपकरणांमधील महत्त्वपूर्ण डेटा काढून त्याचं विश्लेषण करण्यात आलं. संबंधित मोबाईल टॉवरच्या माध्यमातून मिळालेल्या डेटाचंही विश्लेषण केलं गेलं,' अशी माहिती सीबीआयानं दिली. 'सुशांतच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या सगळ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात अतिशय व्यापक आणि सखोल तपास करण्यात आला आहे,' असं सीबीआयनं स्वामी यांना पाठवलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे.सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह १४ जूनला त्याच्या राहत्या घरात आढळून आला. सुशांतची हत्या झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. तशी तक्रारदेखील त्यांनी बिहारमध्ये दाखल केली. यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयानं सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले. मात्र जवळपास ५ महिन्यांतरही सीबीआयच्या हाती ठोस असं काहीही लागलेलं नाही.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभाग