शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पुन्हा मोदी.. आता लोकसभा निवडणुका झाल्यास एनडीएला मिळणार बहुमत, सर्वेक्षणातून बाब समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 8:30 AM

५० टक्के लोकांची मोदींच्या कामालाही पसंती

ठळक मुद्दे५० टक्के लोकांची कामाला पसंतीमोदीच आजवरचे सर्वाधिक आवडते पंतप्रधान

कोरोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि अन्य मुद्दे योग्यरित्या हाताळणाऱ्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची जादू आजही कायम आहे. जर आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यास पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएनला बहुमत मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. इंडिया टु़डे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२,२३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती.आता निवडणुका पार पडल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर केवळ भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा मिळू शकतात. यापैकी काँग्रेसला १९ टक्के जागांसह केवळ ५१ जागांवर समाधान मानावं लागू शकतं. तर अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात लोकांना त्यांचे आवडते मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वेक्षणादरम्यान सर्वाधिक म्हणजेच २५ टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आवडते मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आहेत. त्यांना १४ टक्के लोकांनी पसंती दिली. तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आहेत. त्यांना एकून ८ टक्के लोकांनी पसंती दिली. आजवरचे आवडते पंतप्रधान कोण?सर्वेक्षणानुसार आजवरच्या सर्वात आवडते पंतप्रधान बनण्याचा मानही नरेंद्र मोदी यांनाच मिळाला आहे. ३८ टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम पंतप्रधान असल्याचं म्हटलं.तर १८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पसंती दिली. ११ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आजवरचे आवडते पंतप्रधान असल्याचं म्हटलं.५० टक्के लोकांची कामाला पसंतीकोरोना कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम सर्वोत्तम असल्याचं म्हटलं. तर ५० टक्के लोकांनी त्यांचं काम चांगलं असल्याचं सांगितलं. १८ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधानांचं काम सरासरी असल्याचं सांगण्यात आलं. तर ७ टक्के लोकांनी त्यांचं खराब आणि २ टक्के लोकांनी त्यांचं काम अतिशय खराब असल्याचं सर्वेक्षणादरम्यान सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी