शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हे: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार! कुणाला किती जागा मिळणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 00:20 IST

आज लोकसभा निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला 40.7 टक्के मते मिळतील. तर काँग्रेसला 20.5 आणि इतरांना 38.5 टक्के मते मिळू शकतील...

जर देशात आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भारतीय जनता पक्ष संपूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करू शकतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार, आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजपला 281 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अर्थात भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकते. तसेच काँग्रेसला 78 जागा मिळू शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या. तसेच इतरांना 184 जागा मिळू शकतात.

आज लोकसभा निवडणुका झाल्यास कुणाला किती मते? किती जागा? आज लोकसभा निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला 40.7 टक्के मते मिळतील. तर काँग्रेसला 20.5 आणि इतरांना 38.5 टक्के मते मिळू शकतील. आघाडीच्या दृष्टीने जागांचा विचार करता, आज लोकसभा निवडणुका झाल्या तर, एनडीएला 343 जागा, इंडिया ब्लॉकला 188 तर इतरांना 12 जागा मिळतील.

2 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले सर्वेक्षण - हे सर्वेक्षण इंडिया टुडे-CVoter ने (मूड ऑफ द नेशन (MOTN)) केले आहे. सर्वेक्षणाचा कालावधी 2 जानेवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 असा आहे. यात भारतातील सर्वच्या सर्व 543 लोकसभा मतदारसंघांमधील 54,418 लोकांसोबत चर्चा करण्यात आली. याशिवाय सी-व्होटरने गेल्या 24 आठवड्यादरम्यान 70,705 लोकांचे मतही जाणून घेतले. अर्थात सर्वेक्षणाचा अहवाल तयार करण्यासाठी एकूण 1 लाख 25 हजार 123 लोकांच्या मतांचे विश्लेषण करण्यात आले.

या सर्वेक्षणाचा उद्देश देशातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती समजून घेणे, असा होता. हे सर्वेक्षण CATI (कॉम्प्युटर असिस्टेड टेलिफोन इंटरव्ह्यूइंग) पद्धतीने करण्यात आले. यात देशभरातील लोकांना रँडम डायलिंग (RDD) तंत्राचा वापर करून प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात सर्व टेलीकॉम सर्कल्सचा समावेश आहे. तसेच तो भारताच्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करतो.

डेटाची अचूकता -या सर्वेक्षणात त्रुटीचे प्रमाण मॅक्रो पातळीवर ±3% तर मायक्रो पातळीवर ±5% ठेवण्यात आले आहे. भारतीय लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीने यात, जंडर, वय, शिक्षण, उत्पन्न, धर्म, जात, शहरी/ग्रामीण लोकसंख्या आणि गेल्या निवडणुकीतील मतदानाचा पॅटर्न, आदींचा विचार करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, देशभरातील लोकांना या सर्वेक्षणात सहभागी होता यावे, यासाठी हे सर्वेक्षण 11 राष्ट्रीय भाषांमधून करण्यात आले आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदी