शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आज निवडणूक झाल्यास काँग्रेस होईल विजयी, भाजपाची चिंता वाढवणारा सर्व्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 11:12 IST

काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपासाठी चिंता वाढवणारी एक बातमी आहे

ठळक मुद्देकर्नाटक विधानसभा निवडणूक 2018 साठी आजच्या घडीला निवडणूक घ्यायची ठरल्यास भाजपाचा पराभव करत काँग्रसेचा विजय होईल सी फोरने हा सर्व्हे केला आहेकाँग्रेसला एकूण 43 टक्के तर भाजपाला 32 आणि जेडी(एस)ला 17 टक्के मतं मिळतील

बंगळुरु, दि. 23 - विजयी पताका घेऊन काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपासाठी चिंता वाढवणारी एक बातमी आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2018 साठी काँग्रेसने जोरदार तयारी केली असून आजच्या घडीला निवडणूक घ्यायची ठरल्यास भाजपाचा पराभव करत काँग्रसेचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सी फोरने हा सर्व्हे केला आहे. 19 जुलै ते 10 ऑगस्टरदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेनुसार, निवडणूक झाल्यास काँग्रेसला 120 ते 132 जागा मिळू शकतात. भाजपाच्या जागांमध्ये वाढ होईल, पण त्यांना 60 ते 72 जागाच मिळतील. तर जेडी(एस) 24 ते 30 जागांवर विजय मिळवेल. सर्व्हेनुसार, काँग्रेसला एकूण 43 टक्के तर भाजपाला 32 आणि जेडी(एस)ला 17 टक्के मतं मिळतील.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165 विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सुरु केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचं सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आलं आहे. मात्र यासोबतच पिण्याच्या पाण्याची कमतरता, खराब रस्ते, बेकारी तसंच कचरा नष्ट करण्यासाठी नसलेली योजना या समस्या मतदारांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. 

पीटीआयने गेल्या महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून उमेदवार निवडण्यासाठी माहिती जमा करत आहेत. काँग्रेस विभागनिहाय सर्व्हे करत असून एकदा सर्व्हे पुर्ण झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती देणार आहेत. 

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मात्र भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला होता. काही दिवसांपुर्वीच अमित शहा तीन दिवसांच्या दौ-यावर आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, 'भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मी येथे आलो आहे. लोकांची भेट घेतली असता त्यांना भाजपाला मतदान करायचं असल्याचं दिसत आहे'. 

225 जागांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा 150 जागा जिंकेल असं अमित शहा बोलले आहेत. 150 जागा जिंकत भाजपा सरकार स्थापन करेल असंही ते बोलले आहेत. 2018 च्या सुरुवातीलाच कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी