शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगावप्रकरणी तेलतुंबडे, नवलखा यांना शरणागती अपरिहार्य, सुप्रीम कोर्टातही अटकपूर्व जामीन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 04:33 IST

आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा या दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला आणि या दोघांनी पुढील तीन आठवड्यांत स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन व्हावे असा आदेश दिला.

नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वीच्या भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यातील आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा या दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला आणि या दोघांनी पुढील तीन आठवड्यांत स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन व्हावे असा आदेश दिला.मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने या दोघांनी अपील केले होते. ते प्रलंबित असताना दिलेल्या अंतरिम आदेशामुळे त्यांची अटक आत्तापर्यंत टळली होती. मात्र न्या. अरुण मिश्रा व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीनंतर अपील फेटाळल्याने आता त्यांना सरण येण्याखेरीज गत्यंतर नाही.अलीकडेच या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला. त्यानंतर नवलखा व तेलतुंबडे वगळून अटकेत असलेल्या अन्य आरोपींना विशेष न्यायालयाने ‘एनआयए’ कोठडी दिली आहे.आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना कपिल सिब्बल व डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध काहीच थेट पुरावा नाही. इतरांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये यांच्या नावांचा उल्लेख आहे म्हणून त्यांना आरोपी केले गेले आहे. या दोघांवर प्रतिबंधित माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. पण सरकारने मध्यंतरी शांततात वाटाघाटींसाठी मध्यस्थ म्हणून नवलखा यांचीच मदत घेतली होती, याचाही त्यांनी दाखला दिला. शिवाय गेल्या दोन वर्षांत नवलखा यांना एकदाही चौकशीसाठी बोलावले गेलेले नाही, असेही निदर्शनास आणले गेले. मात्र सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या आरोपींचे कोठडीत जाबजबाब घेणे गरजेचे आहे, असे सांगून अटकपूर्व जामिनास विरोध केला.प्रथमदर्शनी गुन्हाहा गुन्हा बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) नोंदला आहे.आरोपीचा गुन्ह्यात सकृद्दर्शनी सहभाग दिसत असेल तर अटकपूर्व जामीन न देण्याची त्यात तरतूद आहे.खंडपीठाने त्यावर बोट ठेवून या दोघांचे अपील फेटाळले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय