शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य ! राजस्थान पोलिसांत पहिल्यांदाच तृतीय पंथीयाची होणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 12:11 IST

राजस्थान उच्च न्यायालयानं तृतीय पंथीयांच्या बाजूनं निर्णय देत त्यांच्यासाठी सरकारी नोकरीचे दरवाजे खुले केले आहेत.

जयपूर- राजस्थान उच्च न्यायालयानं तृतीय पंथीयांच्या बाजूनं निर्णय देत त्यांच्यासाठी सरकारी नोकरीचे दरवाजे खुले केले आहेत. जालोर जिल्ह्यातील तृतीय पंथीय गंगा कुमारी हिने न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं राजस्थान पोलिसांना गंगा कुमारीला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.खरं तर एखाद्या तृतीय पंथीयाला सरकारी नोकरी देणारा राजस्थानातील हा पहिला प्रकार आहे, तर देशातील हे तिसरं प्रकरण आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजस्थान पोलीस विभाग पोलीस कॉन्स्टेबल या पदावर पहिल्यांदाच तृतीय पंथीयाची नियुक्ती करणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता यांनी सुनावणीदरम्यान गंगा कुमारीला सहा आठवड्यांच्या आत कामावर रुजू करण्यासोबतच तिला 2015पासून राष्ट्रीय लाभ देण्याचाही निर्णय दिला आहे. याचिककर्त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की, गंगा कुमारी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्र असतानाही जालोर पोलीस अधीक्षकांनी तिला नियुक्त केले नाही. कॉन्स्टेबल भरती परीक्षेत पास होऊनही नियुक्तीवरून गृह विभागाचे अधिकारी संभ्रमात होते. गेल्या तीन वर्षांपासून गृह विभागाचे अधिकारी तृतीय पंथीयाला नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेऊ शकलेले नव्हते. ही फाईल गृह विभागात धूळखात पडून होती. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता यांनी पोलीस विभागाला गंगा कुमारीची सहा आठवड्यांमध्ये नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.वर्ष 2013मध्ये 12 हजार पोलीस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी भरती परीक्षा झाली होती. परीक्षेत राजस्थानातील विविध जिल्ह्यातल्या जवळपास 1.25 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 11400 विद्यार्थ्यांची पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी निवड करण्यात आली होती. यात राणीवाडा परिसरात राहणा-या जालोरमध्ये राहणा-या गंगाकुमारीचाही समावेश होता. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची मेडिकल केल्यानंतर गंगा कुमारी तृतीय पंथीय असल्याचं उघड झालं. त्यानंतर जालोर एसपी यांनी फाइल जोधपूरचे रेंज आयजी जीएल शर्मा यांना पाठवून मत मागितले आहे. असा प्रकार पहिल्यांदाच समोर आल्यानंतर 3 जुलै 2015मध्ये फाईल पोलीस मुख्यालयात पाठवण्यात आली होती. परंतु पोलीस अधिकारी गंगाकुमारीबाबत कोणताही निर्णय घेऊ शकले नव्हते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिस