शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Surgical Strike Video: भारतीय जवानांनी PoK मध्ये शिरून 'असा' केला होता दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 10:09 IST

गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

नवी दिल्ली- गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. सर्जिकल स्ट्राइकमध्ये भारतीय लष्करानं रॉकेट लाँचर, मिसाइल आणि छोट्या शस्त्रास्त्रांनी हल्ला चढवला होता. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधल्या भारतीय लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आलं होतं. पाकिस्ताननं उरी सेक्टरमध्ये 18 सप्टेंबर 2016ला हल्ला केला होता. त्याच्या 11 दिवसांनंतरच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आलं होतं. 29 सप्टेंबर 2016ला भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सीमेत तीन किलोमीटर आतपर्यंत घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. त्याच दरम्यान भारतीय लष्करानं पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या कॅम्पना नेस्तनाबूत केलं. पाकिस्तान सीमेवर असलेल्या या लाँचिंग पॅडला भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलं होतं. (सौजन्य- इंडिया टीव्ही )'भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण परिसराला घेरलं होतं. सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून नेण्यात आले. जवळच्या गावांमध्ये हे सर्व मृतदेह दफन करण्यात आल्याचंही समोर आलं होतं. रात्री दोन वाजल्यापासून ते पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन ते चार तास हल्ला सुरू होता', असंही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. सीमेजवळच्या गावातील भारतीय नागरिकांचे काही नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतात. नियंत्रण रेषेपासून 4 किमी अंतरावरील दुधनियाल या खेडेगावातील मुख्य बाजारातून दोन प्रत्यक्षदर्शींनी काही इमारती आगीत भस्मसात झाल्याचे पाहिले. येथील अलहवाई ब्रिज शेवटचे ठिकाण आहे जिथे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व साहित्य पुरवले जाते.मध्यरात्री या भागात गोळीबार आणि स्फोटाचे मोठे आवज झाल्याचे प्रत्यशदर्शीनी स्थानिकांच्या हवाल्याने सांगितले. रात्री गोळीबाराच्या आवाजामुळे येथील लोक घरा बाहेर पडले नाहीत, त्यामुळे त्यांनी भारतीय जवानांना पाहिले नाही. पाच ते सहा मृतदेह ट्रकमध्ये भरून चालहाना येथील लष्कर-ए-तोयबाच्या तळावर नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दहशतवाद्यांनी सीमेचे संरक्षण करण्यात कमी पडल्याबद्दल पाकिस्तानी लष्कराला दोष दिला. भारताच्या या कारवाईमुळे मात्र लष्कर आणि अन्य दहशतवादी गटांना मोठा धक्का बसला होता. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा