शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सुरेश अंगडी यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 08:59 IST

गुरुवारी सायंकाळी 4 वाजता दिल्ली लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  होणार आहेत.

बेळगाव : दिल्लीतील एम्स इस्पितळात कोरोनामुळे निधन झालेले बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यावर गुरुवारी सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिल्लीतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जातील, अशी माहिती मिळाली आहे.

बुधवारी रात्री त्यांचे निधन होताच केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी यांच्यासह कर्नाटकातील मंत्री लोकप्रतिनिधीनी त्यांचे पार्थिव दिल्लीहून बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे व्याही माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे रात्रीच बंगळुरूहून दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले होते. त्यांनीही पार्थिव बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोविड नियमावली नुसार त्यांचे पार्थिव दिल्ली बाहेर नेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली नव्हती. यासाठी अंतिम संस्कार दिल्लीतच होणार असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुरुवारी सायंकाळी 4 वाजता दिल्ली लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  होणार आहेत. कर्नाटक भाजपाचे अनेक नेते, जवळचे कुटुंबीय पहाटे पाच बंगळुरूहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. अंगडी यांची पत्नी मंगला अंगडी, मुलगी श्रद्धा आणि मोठे जावई दिल्लीतच आहेत तर सदाशिव नगर येथे मोठी मुलगी डॉ. स्फूर्ती होत्या. त्या व त्यांचे भाऊ देखील विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली द्वारका सेक्टर 4 मधील लिंगायत स्मशानभूमीत अंगडी यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशीही माहिती मिळाली आहे.

सुरेश अंगडी बेळगाव मतदारसंघातून लोकसभेवर सतत चार वेळा निवडून गेले होते. बुधवारी रात्री त्यांना कोरोनाने हरवले. त्यांना श्रद्धांजली म्हणून बेळगावच्या जनतेने एक दिवस बेळगाव बंद ठेवावे, अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

आणखी बातम्या..

 बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या