शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

छठ पूजेसाठी बिहारला जाण्यासाठी सूरत रेल्वे स्थानकार प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:19 IST

यादरम्यान काही प्रवासी बेशुद्ध पडल्याचीही माहिती समोर आली आहे.

गुजरातमधील सूरतरेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे.  यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीये. गेल्या दोन दिवसांपासून दिवाळी आणि छट पूजेनिमित्त घरी जाणाऱ्यांची मोठी गर्दी स्टेशनवर पाहायला मिळत आहे. शनिवारीही सूरतरेल्वे स्थानक प्रवाशांनी खचाखच भरलं होतं. अशातच बिहारकडे जाणारी ट्रेन पकडण्यादरम्यान चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या घटनेदरम्यान तीन ते चार लोक बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आलं. उपचारादरम्यान, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.सूरतच्या खासदार आणि केंद्र सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश या जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या. पोलिस अधीक्षक (पश्चिम रेल्वे) सरजो कुमारी यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. सकाळी सूरत रेल्वे स्थानकावरून ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली, त्यामुळे एकच गोंधळ झाला आणि काही लोक बेशुद्ध झाले. रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होती. ज्यात काही प्रवाशांना अस्वस्थता जाणवत होती आणि चक्कर आली, अशी माहिती त्यांनी दिली.प्रवाशांपैकी एकाला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला आणि प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं रुग्णवाहिकेत रुग्णालयात नेण्यापूर्वी सीपीआर दिलं. अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीची ओळख अंकित वीरेंद्र सिंग अशी केली आहे.काय म्हणाले गृह राज्यमंत्रीनवसारी येथे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. बिहारकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची संख्या अचानक वाढल्यानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेने एका निवेदनात म्हटलं की, सणासुदीच्या काळात गर्दी लक्षात घेता त्यांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत, ज्यात सूरत आणि उधना येथून विशेष गाड्या चालवणं आणि सुरक्षा, तसंच गर्दीच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी तैनात करण्यासारख्या बाबींचा समावेश आहे.

टॅग्स :Suratसूरतrailwayरेल्वे