रस्त्यावर वाहनांची वर्दळ, लोकांची ये-जा अन् क्षणार्धात तीन मजली इमारत जमीनदोस्त; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 17:00 IST2021-09-22T16:58:35+5:302021-09-22T17:00:21+5:30
शेजारच्या रस्त्यावर वर्दळ सुरू असताना पाडण्यात आली तीन मजली इमारत

रस्त्यावर वाहनांची वर्दळ, लोकांची ये-जा अन् क्षणार्धात तीन मजली इमारत जमीनदोस्त; पाहा VIDEO
सूरत: शहराच्या मजुरा परिसरात असलेली मजल्यांची इमारत पाडण्यात आली आहे. ही इमारत अग्निशमन दलाची होती. अग्निशमन दलाच्या अखत्यारित येणारी रहिवासी इमारत आधी रिकामी करण्यात आली. त्यानंतर ती जमीनदोस्त केली गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जर्जर इमारत जमीनदोस्त होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. इमारत पाडण्यापूर्वी शेजारच्या रस्त्यावरील वाहतूक रोखणं गरजेचं होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आसपासची वर्दळ थांबवणं आवश्यक होतं. मात्र यातलं काहीच करण्यात आलं नाही. रस्त्यावरून लोकांची ये-जा सुरू असताना, वाहनांची वर्दळ सुरू असताना इमारत पाडली गेली. त्यामुळे परिसरात सर्वत्र धुळीचे लोट पाहायला मिळाले. स्थानिकांना, वाहन चालकांना याचा त्रास झाला.
सूरत- अग्निशमन दलाची जुनी तीन मजली इमारत जमीनदोस्त https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/ALJ9eFZASY
— Lokmat (@MiLOKMAT) September 22, 2021
इमारत पाडली जात असताना सूरत महानगर पालिका आणि इमारत पाडण्याचं कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. परिसरातील वाहतूक, लोकांची ये-जा न रोखताच इमारत जमीनदोस्त करण्यात आली. आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे स्थानिकांचं लक्ष लागलं आहे.