शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:07 IST

Supriya Sule PM Modi: वेगवेगळ्या देशात गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. या भेटीवेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांना दोन पुस्तके दिली.

Supriya Sule PM Modi News: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता. पाकिस्तानकडून खोटे आरोप करत कांगावा केला गेला. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी भारताने जगभरात शिष्टमंडळं पाठवली. ही शिष्टमंडळे मायदेशी परतल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींना दोन पुस्तके भेट म्हणून दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे वारंवार समोर आले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत दहशतवाद्यांवर जबर घाव घातला. भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईबद्दल पाकिस्तानने मात्र खोटे दावे केले. पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणण्यासाठी भारताने खासदारांची सात शिष्टमंडळे जगभरात पाठवली होती. 

मोदींनी घेतली शिष्टमंडळातील नेत्यांची भेट 

वेगवेगळ्या देशात जाऊन भारताची बाजू मांडणाऱ्या शिष्टमंडळातील नेत्यांची पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भेट घेतली. या भेटीवेळी खासदारांनी पंतप्रधान मोदींना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींना दोन पुस्तके भेट म्हणून दिली. 

वाचा >>जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल; सुप्रिया सुळेंचे एकत्रीकरणाबाबत विधान

सुप्रिया सुळे यांनी मोदींना कोणती पुस्तके दिली?

खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारी राम प्रधान यांची 'वाय. बी. चव्हाण अ पिक्चरल बायोग्राफी' आणि 'वाय. बी. चव्हाण सिलेक्टेड स्पीचेस् इन पार्लिमेंट' ही दोन पुस्तके भेट दिली.

सुप्रिया सुळेंनी मानले आभार

या भेटीबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या, "दहशतवादाच्या विरोधात भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडण्यासाठी पाठविण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या सदस्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भेट घेतली. या अतिशय महत्त्वाच्या अशा एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. या शिष्टमंडळाने कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्त या देशांचा दौरा करुन देशाची भूमिका मांडली. या दौऱ्यासाठी माझी निवड करुन एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली याबद्दल भारत सरकार, पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संसदीय कार्यमंत्री किरेनजी रिजेजू यांचे मनापासून आभार."

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानNCPराष्ट्रवादी काँग्रेस