शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ईडीचे अधिकारी पोलीस नाहीत; अटकेचे, संपत्ती जप्तीचे अधिकार अबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 07:21 IST

मनी लाँड्रिंगची व्याख्याही योग्यच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  आरोपीच्या मालमत्तेवर टाच आणणे, त्याला अटक करणे, शोधमोहीम आदीबाबत ईडीला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) - २००० अंतर्गत मिळालेले अधिकार घटनात्मकदृष्ट्या वैध आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ईडीचे हे सारे अधिकार न्यायालयाने कायम ठेवले आहेत. 

यासंदर्भातील काही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल दिला. आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची आरोपीचीही जबाबदारी आहे, असे पीएमएलए कायद्यात म्हटले आहे. ती तरतूदही योग्य असल्याचे न्यायालयाने सांगितले. जामीन मिळविण्यासाठी पीएमएलए कायद्यातील ४५ व्या कलमामध्ये असलेल्या दोन अटी न्यायालयाने योग्य ठरविल्या. आरोपीला जामीन मिळण्यास सरकारी वकिलाने विरोध केल्यास अशा स्थितीत न्यायालयाने दोन गोष्टींचा विचार करावा, असे या कायद्यामध्ये म्हटले आहे. 

ईसीआयआरची एफआयआरशी तुलना होऊ शकत नाहीएन्फोर्समेन्ट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) हा ईडीचा कार्यालयीन अंतर्गत दस्तावेज आहे. ईसीआयआरची तुलना फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्टशी (एफआयआर) होऊ शकत नाही. त्यामुळे ईडीने आरोपीला ईसीआयआरची प्रत देणे बंधनकारक नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मनी लाँड्रिंगची व्याख्याही योग्यचकलम ३ अन्वये मनी लाँड्रिंगच्या केलेल्या कायदेशीर व्याख्येविरोधातही याचिकादारांनी दाद मागितली होती. पण, याचिकादारांचे म्हणणे न्यायालयाने अमान्य केले. २०१९मध्ये मनी बिलाद्वारे (विधेयक) पीएमएलए कायद्यात केलेल्या काही सुधारणांच्या घटनात्मक वैधतेबाबत सात न्यायाधीशांचे विस्तारित खंडपीठच निर्णय घेईल, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.   

ईडीचे अधिकारी पोलीस नाहीतकायद्याच्या ५० व्या कलमाच्या आधारे  आरोपीच्या नोंदविलेल्या जबाबाच्या वैधतेलाही याचिकादारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. स्वत:ला गुन्हेगार ठरविणारी वक्तव्ये करण्यापासून व्यक्तीला राज्यघटनेच्या कलम २० (३) अंतर्गत संरक्षण दिले आहे. मात्र, ईडी अधिकारी हे पोलीस अधिकारी नसल्याने या तरतुदी लागू होणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय