याकूब मेमनच्या फाशीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
By Admin | Updated: June 2, 2014 11:25 IST2014-06-02T11:24:58+5:302014-06-02T11:25:12+5:30
१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटांमधील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

याकूब मेमनच्या फाशीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २ - १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटांमधील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला सोमवारी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने संविधान पीठाकडे पाठवण्याचा निर्णय दिला आहे.
मुंबई बाँबस्फोटांमधील आरोपी याकूब मेमनला टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टानेही ही शिक्षा कायम ठेवल्याने मेमनने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. मात्र १० दिवसांपूर्वी राष्ट्रपतींनीही मेमनची दया याचिका फेटाळून लावल्याने मेमनला फाशी होणारच हे स्पष्ट झाले होते. मात्र मेमनच्या वतीने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी न करण्यासाठी व यासंदर्भातील निर्णय चँबर कार्यवाहीत घ्यावा यासाठी दाखल केलेली याचिका संविधान पीठाकडे पाठवली आहे.