सीबीआय संचालकांना सुप्रीम कोर्टाचा झटका

By Admin | Updated: September 5, 2014 02:24 IST2014-09-05T02:24:51+5:302014-09-05T02:24:51+5:30

वृत्त प्रसिद्धी माध्यमात प्रसारित आणि प्रकाशित करण्यावर प्रतिबंध लावण्याची सिन्हा यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Supreme Court's shock to CBI directors | सीबीआय संचालकांना सुप्रीम कोर्टाचा झटका

सीबीआय संचालकांना सुप्रीम कोर्टाचा झटका

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक रणजीत सिन्हा यांच्या घरी येणा:या अभ्यागतांची यादी संदर्भातील वृत्त प्रसिद्धी माध्यमात प्रसारित आणि प्रकाशित करण्यावर प्रतिबंध लावण्याची सिन्हा यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. 
सोबतच न्यायमूर्ती एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सीबीआय संचालकांच्या घरच्या अभ्यागत नोंदवही नोदींबाबत मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगून प्रसिद्धी माध्यमे जबाबदारीने वागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. 
प्रतिष्ठा आणि व्यक्तिगततेच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे अभ्यागत नोंदवहीतील माहिती प्रकाशित करण्याला प्रसिद्धी माध्यमांना बंदी घालण्यात यावी, अशी सीबीआय संचालकांच्या वकिलांची विनंती न्यायालयाने फेटाळली. प्रेसवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही, असे न्यायाधीश म्हणाले. रणजीत सिन्हा यांचे ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी या दस्तऐवजाच्या सत्यता आणि स्नेतावर प्रश्न उपस्थित केला. सीबीआय संचालकांनी त्यांच्यावरील लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगून हे वक्तव्य पूर्णपणो असत्य असल्याचेही ते म्हणाले.
न्यायालयाने या दस्तऐवजावर आधारित वृत्त प्रसारित आणि प्रकाशित करण्यापासून  मीडियाला प्रतिबंध करण्यास नकार दिला.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास कोळसा घोटाळ्याच्या चौकशीतून अंग काढून घेऊ, असे केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक रणजीत सिन्हा म्हणाले. सिन्हा यांच्यावर 2 जी घोटाळ्यातील आरोपी कंपनीच्या अधिका:यांची भेट घेतल्याचा आरोप होत आहेत.
 
च्आधीच्या संपुआसरकारच्या काळात झालेल्या 2-जी स्पेक्ट्रम वाटप आणि कोळसा खाणपट्टय़ांचे वाटप या दोन कथित घोटाळ्य़ांचा तपास ‘सीबीआय’ करीत आहे. या दोन्हींसंबंधीची प्रकरणो भूषण यांच्या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात दाखल केली होती. एकीकीडे हा तपास सुरु असताना, दुसरीकडे सीबीआयचे संचालक या दोन्ही घोटाळ्य़ांमधील आरोपींना भेटत राहिल्याचे त्यांच्या निवासस्थानी ठेवलेल्या अभ्यागतांच्या नोंदवहीतील नोंदींवरून दिसते.
 
च्हा तपास सीबीआयने सुरु ठेवणो कितपत योग्य आहे,याचा न्यायालयाने विचार करावा, अशी याचिका या संस्थेने केली आहे. गेल्या आठवडय़ात अॅड. भूषण यांनी ही गंभीर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांमध्ये सिन्हा यांनी कोणाकोणाची भेट घेतली याचा तपशील प्रसिद्ध झाला. त्या पाश्र्वभूमीवर सिन्हा यांनी प्रसिद्धी माध्यमांवर र्निबध घालण्याची विनंती केली होती. अशा प्रकारे सीबीआय संचालकांनाच आता जणू आरोपीच्या पिंज:यात उभे केले.   

 

Web Title: Supreme Court's shock to CBI directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.