शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:50 IST

लहान मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Supreme Court : देशभरात लहान मुलांवरील लैंगिक छळाच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या काही काळापासून अशा अनेक घटना ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सर्व राज्य सरकारांवर ताशेरे ओढले. महाराष्ट्रातील बदलापूरसह देशातील विविध ठिकाणी घडलेल्या बालकांच्या लैंगिक छळाच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवण्यास सांगितले आहे. तसेच, केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची सर्व राज्यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

NCPCR ला अहवाल सादर करावान्यायालयाने नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ला राज्यांद्वारे मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तसेच NCPCR ला राज्यानी स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

केंद्राने 2021 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे तयार केली1 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकारने शाळांमध्ये मुलांच्या लैंगिक छळाबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याची मागणी एनजीओ बचपन बचाओ आंदोलनाने न्यायालयाकडे केली आहे.

केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्र सरकारने मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यामध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांची पडताळणी, शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण, शिक्षक आणि पालकांच्या बैठका आणि नियमित अंतराने सुरक्षा मापदंड तपासणे यांचा समावेश आहे. न्यायालयाने आता या मार्गदर्शक तत्त्वांची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

केवळ 5 राज्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेएनजीओने आरोप केला आहे की, केवळ पाच राज्ये (पंजाब, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, मिझोराम, दमण आणि दीव) यांनी मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. उर्वरित राज्यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे थोडेसेही पालन केलेले नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग