शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 09:46 IST

सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करणा-या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली- सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करणा-या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर निर्णय घेतला जाणार आहे. न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटीमार्फत करायची की नाही, यावर आज निर्णय होणार आहे.काँग्रेस नेते तहसीन पूनावाला, पत्रकार बीएस लोणे, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनसहीत इतर पक्षकारांनी न्या. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांवर मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींचं पीठ सुनावणी करून निकाल देणार आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. आता न्यायालय हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे सोपवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने संबंधित असलेली दोन प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली होती. काय आहे प्रकरण ?नागपूर येथे 1 डिसेंबर 2014 रोजी हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला. तशी रुग्णालयात नोंद आहे. ते आदल्या दिवशी एका सहका-याच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित होते. ते ज्या खटल्याची सुनावणी करत होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. न्या. लोया यांच्या बहिणीने न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने मीडियाकडे संशय व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले होते. महाराष्ट्रातील पत्रकार बी. आर. लोणे यांची याचिका विचारार्थ घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये झालेल्या सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्याची सुनावणी करणा-या मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे लोया न्यायाधीश होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरण