शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:53 IST

Supreme Court On Digital Arrest Scam: भारतातील डिजिटल अटक प्रकरणांच्या तपासासंबंधात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

भारतातील डिजिटल अटक प्रकरणांच्या तपासासंबंधात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अशा प्रकारची सर्व प्रकरणे केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे संकेत न्यायालयाने दिले. या प्रस्तावावर न्यायालयाने सीबीआय तसेच देशातील सर्व राज्य सरकारांना त्यांचे उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्तींच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, डिजिटल अटक घोटाळ्यांचा तपास एकाच एजन्सीमार्फत झाल्यास तपासामध्ये एकसमानता सुनिश्चित होईल.

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला विचारणा केली आहे की, 'डिजिटल अरेस्ट'सारख्या गुंतागुंतीच्या सायबर गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्यासाठी सीबीआयकडे आवश्यक तांत्रिक कौशल्ये आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का? सीबीआयने यावर आपले सविस्तर मत न्यायालयात सादर करणे अपेक्षित आहे.

या महत्त्वपूर्ण प्रस्तावावर देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांचे मत मांडण्यासाठी न्यायालयाने सांगितले. 'डिजिटल अरेस्ट' हा एक सायबर घोटाळ्याचा प्रकार आहे, जिथे गुन्हेगार तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना फसवतात. त्यामुळे, सर्व राज्यांनी एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे.

पुढील सुनावणी ३ नोव्हेंबर रोजी

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दिवशी सीबीआय आणि राज्य सरकारांच्या उत्तरांवर न्यायालय विचार करेल आणि अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. डिजिटल अटक प्रकरणांचा तपास जर सीबीआयकडे गेला, तर देशभरात सायबर गुन्हेगारीच्या तपासात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

'डिजिटल अरेस्ट' म्हणजे काय?

'डिजिटल अरेस्ट' ही एक सायबर फसवणुकीची अत्यंत गुंतागुंतीची आणि धोकादायक पद्धत आहे, जी अलीकडच्या काळात खूप वाढली आहे. पीडित व्यक्तीला फोन किंवा व्हिडिओ कॉल येतो. कॉल करणारी व्यक्ती स्वतःला पोलीस, सीबीआय, ईडी किंवा इतर कोणत्याही मोठ्या सरकारी/कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेचा अधिकारी असल्याचे सांगते. गुन्हेगार पीडित व्यक्तीला सांगतात की, त्याच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते किंवा सिम कार्डचा वापर मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी किंवा इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्यामध्ये वापर झाला आहे. त्यामुळे तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हेगार अनेकदा व्हिडिओ कॉलवर पोलिसांचा गणवेश परिधान करतात. त्यांच्या कॉलच्या बॅकग्राउंडमध्ये बनावट पोलीस ठाणे किंवा न्यायालय दाखवतात. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत किंवा 'अटक' टाळण्यासाठी पीडित व्यक्तीकडून बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची मागणी करतात. पीडित व्यक्ती घाबरून किंवा कायद्याच्या कारवाईच्या भीतीने आपल्या आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावतो. 

'डिजिटल अरेस्ट'पासून वाचण्यासाठी काय कराल?

भारतीय कायद्यात 'डिजिटल अरेस्ट' किंवा ऑनलाइन अटक अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. कोणतेही सरकारी किंवा तपासणी एजन्सी तपास पूर्ण होईपर्यंत किंवा दंड म्हणून फोनवरून पैशाची मागणी करत नाही. असा कॉल आल्यास घाबरून न जाता, त्याची खात्री करण्यासाठी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलकडे संपर्क साधावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Steps In: No Escape for Digital Arrest Fraudsters Now!

Web Summary : Supreme Court considers transferring digital arrest cases to CBI for unified investigation. States must respond. Digital arrest is a cyber fraud where scammers impersonate officials, demanding money. Awareness is key.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी