शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

कृषी कायद्यांना स्थगिती देता येईल काय?; सुप्रीम कोर्टाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:39 IST

आंदाेलनासंदर्भातील याचिकांवर सर्वाेच्च न्यायालयात सरन्यायाधीश शरद बाेबडे यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे सुनावणी झाली. शेतकऱ्यांना आंदाेलन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देता येईल का, अशी विचारणा सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा हाेणे आवश्यक असून त्यासाठी निष्पक्ष समिती स्थापन करण्याचा विचार करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी हजर नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आंदाेलनासंदर्भातील याचिकांवर सर्वाेच्च न्यायालयात सरन्यायाधीश शरद बाेबडे यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे सुनावणी झाली. शेतकऱ्यांना आंदाेलन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. न्या. बाेबडे म्हणाले की, काेणतेही आंदाेलन ताेपर्यंत वैध ठरते जाेपर्यंत मालमत्ता किंवा प्राणहानी हाेत नाही. इतर नागरिकांच्या अधिकारांवर गदा येणार नाही, अशा पद्धतीने आंदाेलनात बदल करता येऊ शकताे का, याबाबत न्यायालयाने केंद्राला विचारणा केली. कायद्यांना स्थगिती दिल्यास शेतकरी चर्चेसाठी पुढे येणार नाही, असा युक्तिवाद केंद्राने केला. न्यायालयाने ताे फेटाळला.सुनावणीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गाेयल आणि नरेंद्रसिंह ताेमर यांच्यासाेबत भाजपच्या मुख्यालयात बैठक घेतली. न्यायालयाने दिलेल्या सूचनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.सुप्रीम कोर्टात काय  झाले ?समितीचा प्रस्तावकृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांच्यासह कृषी संघटनांच्या प्रतिनिधींची एक समिती स्थापन करण्याची सूचना सरन्यायाधीशांनी केली. समितीच्या शिफारसींचे पालन करावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्राची कानउघाडणीशेतकरी हट्ट धरून बसल्याचे केंद्राने म्हणताच न्यायालयाने केंद्राची कानउघाडणी केली. सरकारही हटवादी असल्याचे शेतकऱ्यांनाही वाटू शकते. तुमचे प्रस्ताव शेतकरी स्वीकारतील असे वाटत नाही, असे न्यायालय म्हणाले. शेतकऱ्यांना खडे बाेल काेणत्याही प्रकारचा हिंसाचार मान्य नसून तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या शहराची काेंडी करू शकत नाही, असे खडे बाेलही न्यायालयाने आंदाेलकांना सुनावले.‘आप’ने फाडली कृषी कायद्याची प्रतआणखी किती बळी घेणार, असा प्रश्न करतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या सदस्यांनी विधानसभेत कृषी कायद्याची प्रत फाडली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी आंदोलन आणि कोर्टाचे म्हणणे या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी केली आहे.काेराेनाची भीतीशेतकरी गावी गेल्यानंतर तिथे काेराेना पसरण्याची भीती असल्याचे सांगून इतरांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा अधिकार आंदाेलकांना नाही, असा युक्तिवाद महाधिवक्ते के. के. वेणुगाेपाल यांनी केला. आंदाेलनामध्ये आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली असून  कडाक्याच्या थंडीमुळे ३७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे बाेलले जात आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय