शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या ५००, १००० रुपयांच्या नोटा बदलण्याची संधी पुन्हा मिळणार?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 14:36 IST

बनावट नोटा, काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आली होती असं सांगत अ‍ॅटर्नी जनरल यांनी नोटाबंदीच्या अधिसूचनेचा कोर्टात बचाव केला

नवी दिल्ली : जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा पुन्हा बदलण्याची संधी मिळू शकते का? कदाचित हा प्रश्न तुम्हाला आश्चर्यचकित करेल. नोटाबंदीच्या सहा वर्षानंतर हे कसे शक्य होईल असं तुम्हाला वाटत असेल. पण सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे नजर टाकली तर ते अशक्य नाही. ठरविक मुदतीत ज्या व्यक्तींकडून जुन्या नोटा बदलून घेण्याची वेळ निसटली असेल त्यांनी केलेल्या अर्जांचा रिझर्व्ह बँकेने (RBI) विचार करावा असं नोटाबंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. 

काही प्रकरणांचा विचार केला जाऊ शकतोपाच न्यायाधीश न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, बी.आर. गवई, ए.एस. बोपण्णा, व्ही. रामसुब्रमण्यम आणि बी.व्ही. नगररत्न यांच्या खंडपीठाने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या ८ नोव्हेंबरच्या निर्णयाच्या वैधतेचा विचार करत आहेत. Live Law मधील वृत्तानुसार, भारताचे अ‍ॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी म्हणाले, नोटाबंदीच्या नोटा बदलण्याच्या तारखा वाढवता येणार नाहीत. परंतु ज्या अर्जदारांनी आवश्यक अटींची पूर्तता करून आणि सेंट्रल बँकेच्या विनाहरकत काही वैयक्तिक प्रकरणांचा रिझर्व्ह बँक विचार करेल. आरबीआयकडे आलेल्या ७०० अर्जांबाबत ते बोलत होते.

आता या याचिकांना काही अर्थ नाहीअ‍ॅटर्नी जनरल यांनी नोटाबंदीच्या अधिसूचनेचा कोर्टात बचाव केला. ते म्हणाले की, बनावट नोटा, काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आली होती. रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ च्या नियमांनुसार नोटाबंदी लागू करण्यात आली होती, असं सरकारचं म्हणणं आहे. सहा वर्षांनंतरच्या याचिकांवर विचार करणं त्याला काहीही अर्थ नाही असं त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले.

याचिकाकर्त्यांची मागणी काय?नोटाबंदीला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यांच्याकडे जुन्या नोटा पडून असल्याचं याचिकेत सांगण्यात आले. याचिकाकर्त्यांपैकी एकाने सांगितले की, त्याने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त जुन्या नोटा ठेवल्या आहेत. त्यावर न्यायालयाने सांगितले की, तुम्ही त्या जपून ठेवा. नोटाबंदीच्या वेळी ते परदेशात होते. नोटा बदलण्याची मुदत मार्चअखेरपर्यंत राहील असं सांगितले होते. परंतु मार्चपूर्वी बंद करण्यात आलं होतं असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDemonetisationनिश्चलनीकरणReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक