शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मायावती, मुलायम सिंह, राजनाथ यांना सरकारी बंगले सोडावे लागणार; सुप्रीम कोर्टाचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 14:05 IST

माजी मुख्यमंत्र्यांचे बंगले जाणार

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना बंगले सोडावे लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होताच कोणतीही व्यक्ती सर्वसामान्य होते, असं सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण आदेश देताना नमूद केलं. न्यायालयानं दिलेला हा आदेश उत्तर प्रदेश सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय. लोक प्रहरी संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयानं यूपी मिनिस्टर सॅलरी अकाऊंट अॅण्ड मिसलेनियस प्रोव्हिजन अॅक्टमधील काही तरतुदी रद्द केल्या. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी आदेश देताना या कायद्यातील कलम 4(3) रद्द केले. या तरतुदींच्या आधारे माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगल्यांमध्ये वास्तव्य करण्याचा अधिकार देण्यात आला होता. मात्र आता या तरतुदी रद्द करण्यात आल्यानं माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले रिकामे करावे लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे अनेक दिग्गज नेत्यांना सरकारी बंगले सोडावे लागतील. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, बसपा अध्यक्ष मायावती, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह आणि माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले हे नेते सध्या अवघं साडे पाच ते साडे तारा हजार रुपये भाडं भरुन सरकारी बंगल्यांमध्ये राहतात. 

३० वर्षांपासून बंगला तिवारींच्या ताब्यातनारायण दत्त तिवारी १९८९ साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. नंतर त्या राज्याचे विभाजन झाले आणि उत्तराखंड हे नवेराज्य तयार झाले. ते २00२ ते  २00७ या काळात उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. तरीही त्यांनी उत्तर प्रदेशमधील सरकारी बंगला कायम ठेवला. त्यानंतर ते २00९ पर्यंत आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते. ते सध्या काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंडात भाजपाचे सरकार यावे, यासाठी पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांना आशीर्वाद दिले होते. यूपीने केला कायदा, कोर्टाने झापले! माजी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले बंगले सरकारने रिकामे करून घ्यावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २0१६ सालीच उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. मात्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. शिवाय माजी मुख्यमंत्र्यांना कायमस्वरूपी सरकारी बंगल्यात राहता येईल, अशी तरतूद संबंधित कायद्यात गेली. त्याबद्दल न्यायालयाने आज उत्तर प्रदेश न्यायालयात खूपच फटकारले. उत्तर प्रदेश सरकारची कायद्यातील तरतूद पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधी आहे, असे सुनावताना मनमानी पद्धतीने असा कायदा करण्यात आल्याबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली.

राम नरेशनी आधीच सोडला बंगलामाजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांनाही सरकारी बंगला देण्यात आला होता. पण न्यायालयाचा निकाल येण्याआधीच यादव यांनी आपला बंगला रिकामा करून दिला. मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, मायावती व नारायण दत्त तिवारी सध्या कोणत्याही सत्तापदावर नाहीत. राजनाथ सिंह हे केंद्रात गृहमंत्री आहेत, तर कल्याण सिंह हे राजस्थानचे राज्यपाल आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवmayawatiमायावतीRajnath Singhराजनाथ सिंह