शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टदेखील आमचंच, राम मंदिर उभारणारच- भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 11:27 IST

भाजपा आमदाराच्या विधानानं नवा वाद; टीका होताच सारवासारव

लखनऊ: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना, भाजपानं पुन्हा राम मंदिराचा राग आळवला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा तयार करण्याचं विधान नुकतंच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलं होतं. आता याच मुद्यावर उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयदेकील आमचंच आहे. त्यामुळे राम मंदिर उभारणारच, असं उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बहराईचमधील केसरगंज विधानसभेचं प्रतिनिधीत्व करणारे भाजपा आमदार आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांना राम मंदिराच्या उभारणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयदेखील आमचंच आहे, असं म्हटलं.'भाजपा विकासाच्या मुद्यावर सत्तेवर आला आहे. मात्र तरीही राम मंदिराची उभारणी होणारच. कारण तो आमचा संकल्प आहे. सध्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालयदेखील आमचंच आहे,' असं वर्मा म्हणाले. मुकुट बिहारी वर्मा फक्त न्यायालयावरच थांबले नाहीत. त्यापुढे जात न्यायपालिका, प्रशासन, देश आणि मंदिर आमचं आहे, असंही ते म्हणाले या विधानावरुन वाद होताच वर्मा यांनी सारवासारव केली. 'आपण देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे आपला देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असा आपल्या विधानाचा अर्थ होता,' अशा शब्दांमध्ये त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. न्यायालय आमच्या सरकारचं आहे असं मी म्हटलं नाही, असं स्पष्टीकरणही वर्मा यांनी दिलं. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश