शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

झुंडशाही रोखा, सुप्रीम कोर्टाचा निर्वाणीचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 06:40 IST

ठरावीक विचारसरणीने समाजाचे होणारे ध्रुवीकरण आणि उभ्या राहणाऱ्या झुंडशाही हिंसाचाराच्या भस्मासुराने प्रस्थापित व्यवस्था खिळखिळी करण्याआधीच सरकारने या उन्मादी झुंडशाहीचा कठोरपणे बिमोड करावा

नवी दिल्ली : ठरावीक विचारसरणीने समाजाचे होणारे ध्रुवीकरण आणि उभ्या राहणाऱ्या झुंडशाही हिंसाचाराच्या भस्मासुराने प्रस्थापित व्यवस्था खिळखिळी करण्याआधीच सरकारने या उन्मादी झुंडशाहीचा कठोरपणे बीमोड करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. लोकशाही व्यवस्था, बहुढंगी संस्कृती व सहिष्णू बंधुभावाचा वारसा टिकवायचा असेल, तर झुंडशाही फोफावण्याआधीच तिला नख लावण्याखेरीज अन्य पर्याय नाही, असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले.कायद्याची जरब हा सुजाण समाजाचा पाया असल्याने, जमावांकडून होणारी हिंसा हा स्वतंत्र गुन्हा ठरविणारा कायदा संसदेने करावा आणि त्यात कडक शिक्षेची तरतूद करावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली.गोहत्या व गोमांस भक्षणाच्या संशयावरून गोरक्षकांकडून विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाणीच्या व प्रसंगी हत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या काही याचिका न्यायालयात प्रलंबित होत्या. अलीकडे मुले पळविण्याच्या अफवांनी महाराष्ट्रासह काही राज्यांत काहींच्या हत्या झाल्या. समाज माध्यमांतील अफवांवरून झुंडशाहीकडून संशयितांच्या हत्यांचे पेव फुटले. सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या दोन्ही प्रकारच्या झुंडशाहीचा समग्रपणे परामर्श घेणारे ४५ पानी निकालपत्र दिले.>न्यायालयाची टिप्पणीकाही मूठभर लोकांना, कोणत्याही कारणाने कायदा हाती घेऊन परस्पर न्यायनिवाडा करू दिला, तर त्यातून अराजकता माजेल. अशा झुंडशाहीला वेळीच खंबीरपणे आवर घातला नाही, तर प्रस्थापित व्यवस्था पार उद्ध्वस्त होईल. असहिष्णुता आणि असत्य माहिती व अफवांवरून देशभरात जमावांकडून होणाºया हत्यांच्या घटना भयावह आहेत. त्यातून आपला हा महान देश सहिष्णुता आणि बंधुभावाची शाश्वत मूल्ये हरवून बसला की काय, अशी शंका येते.>सहा महिन्यांत खटले निकाली काढाझुंडशाहीविरोधी कोणताही स्वतंत्र कायदा सध्या तरी नसल्याने, अशी प्रकरणे प्रचलित कायद्यानुसारच हाताळावी लागतील. तरीही ते करताना दिरंगाई, हेळसांड आणि कसूर यास जागा राहू नये, यासाठी निश्चित चौकट व निकष ठरवून दिले गेले. झुंंडशाहीच्या पीडितांना तत्परतेने पुरेशी भरपाई देणे, त्यांना आणि साक्षीदारांना संरक्षण देणे, असे खटले विशेष जलदगती न्यायालयांत चालवून, शक्यतो सहा महिन्यांत निकाली काढा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. काही मंडळींनी मूळ याचिकांमध्ये सहभागी होऊन विविध सबबी देत, अशा झुंडशाहीचे लंगडे समर्थन करणारा युक्तिवाद केला होता. मात्र, त्यांना ठामपणे झिडकारत न्यायालयाने, काही झाले, तरी कोणालाही कायदा हातात घेऊन आपल्या मतांनुसार न्याय करण्याचे स्वातंत्र्य कदापि दिले जाऊ शकत नाही, हे अधोरेखित केले.कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारितील विषय असल्याने, अशा घटनांना आळा घालण्याची जबाबदारी न्यायालयाने राज्यांवर टाकली. अशी झुंडशाही होऊच नये, यासाठी कोणते उपाय योजावेत व ते घडलेच, तर ते कठोरतेने कसे हाताळावेत, याची मार्गदर्शिकाही न्यायालयाने ठरवून दिली. हे सर्व उपाय महिनाभरात अंमलात आणणे राज्यांना बंधनकारक केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय