शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:52 IST

'अटकेचा अधिकार पोलिसांच्या सोयीसाठी नसून कठोर कायदेशीर गरज म्हणून वापरला पाहिजे.'

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने आज पोलीस कारवाई आणि अटकेशी संबंधीत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये कमाल 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना थेट अटक करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अटक करण्यापूर्वी आरोपीला नोटीस देणे अनिवार्य असेल, असे न्यायालयाने ठणकावून सांगितले. हा निर्णय सतेंद्र कुमार अंतिल विरुद्ध CBI या प्रकरणात देण्यात आला आहे. न्या. एम.एम. सुंदरेश आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा निकाल सुनावला.

अटक हा अपवाद, नियम नाही- सुप्रीम कोर्ट

निर्णय देताना न्यायालयाने स्पष्ट केले की, अटक करणे हा पोलिसांचा अधिकार आहे, मात्र ती कोणतीही रूटीन किंवा बंधनकारक प्रक्रिया नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 च्या कलम 35(3) नुसार, 7 वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांत आरोपीला प्रथम नोटीस देऊन चौकशीत हजर राहण्यास सांगणे आवश्यक आहे.

चौकशीसाठी अटक करता येणार नाही

सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, केवळ चौकशीसाठी एखाद्या व्यक्तीला अटक करता येणार नाही. अटक करण्यासाठी पोलिसांकडे ठोस आणि लेखी कारणे असणे आवश्यक आहे. जर आरोपी सहकार्य करत असेल आणि कोठडीशिवाय तपास शक्य असेल, तर अटक टाळली पाहिजे, असे निर्देश न्यायालयाने दिले.

आधी नोटीस, शेवटचा पर्याय म्हणून अटक

कोर्टाने अटक प्रक्रियेबाबत ठाम भूमिका मांडली आहे. आधी नोटीस द्यावी लागणार, आरोपीने सहकार्य न केल्यासच शेवटचा पर्याय म्हणून अटक केली जावी. अटकेचा अधिकार हा पोलिसांच्या सोयीसाठी नसून कठोर कायदेशीर गरज म्हणून वापरला गेला पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले.

कधी होऊ शकते अटक?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, आरोपी तपासात सहकार्य करत नसेल, पुरावे नष्ट करण्याची शक्यता असेल किंवा फरार होण्याची शक्यता असेल, अशा परिस्थितीतच अटक योग्य ठरू शकते. नोटीसनंतर अटक ही अपवादात्मक बाब असून तिचा वापर अत्यंत विचारपूर्वक केला गेला पाहिजे, असेही कोर्टाने स्पष्ट केले.

सामान्य नागरिकांना मोठा दिलासा

या निर्णयाचा थेट फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. आता 7 वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांत विनाकारण अटक होणार नाही. आधी नोटीस मिळेल, अटक करायची असल्यास पोलिसांना मजबूत कारणे द्यावी लागतील. हा निर्णय पोलिसी कारवाईत पारदर्शकता आणणारा आणि नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करणारा मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Notice mandatory, police can't arrest directly: Supreme Court's major decision

Web Summary : Supreme Court ruled police can't directly arrest in cases with up to 7-year sentences. Notice before arrest is mandatory. Arrest is an exception, not the rule. Arrest only if non-cooperation, evidence tampering, or flight risk exists. This protects individual freedom.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसArrestअटक