शहरं
Join us  
Trending Stories
1
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
2
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
3
५० देशांच्या जीडीपीपेक्षा BMC ची तिजोरी मोठी; पाहा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे आर्थिक गणित
4
BCCL IPO Allotment Status: बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
5
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
6
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
7
एनपीएसधारकांसाठी आली गूड न्यूज, आता मिळणार 'निश्चित' पेन्शनची हमी! प्रकरण काय?
8
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
9
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
10
Stock Market Today: शेअर बाजारात कमकुवत सुरुवात, निफ्टीमध्ये ८४ अंकांची घसरण; 'हे' शेअर्स आपटले
11
WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
12
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
15
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
16
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
17
बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
18
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
19
प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
20
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
Daily Top 2Weekly Top 5

विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:17 IST

Supreme Court Manusmriti judgment: न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती एस.व्ही.एन. भट्टी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, पतीचा मृत्यू सासऱ्याच्या आधी झाला की नंतर, यावरून सुनेचे हक्क बदलत नाहीत. दोन्ही परिस्थितीत सून ही 'आश्रित'च असते.

नवी दिल्ली: पतीच्या निधनानंतर विधवा सुनेला वाऱ्यावर सोडणाऱ्या सासरच्या मंडळींना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. "कोणत्याही आईला, वडिलांना, पत्नीला किंवा मुलाला त्यागता येणार नाही," या 'मनुस्मृती' मधील श्लोकाचा दाखला देत न्यायालयाने एका विधवा सुनेला तिच्या सासरच्या संपत्तीतून पोटगी मिळवून दिली आहे.

या प्रकरणातील सून (गीता शर्मा) हिच्या पतीचा मृत्यू तिच्या सासरांच्या निधनानंतर झाला होता. कनिष्ठ न्यायालयाने तांत्रिक कारण सांगत तिचा पोटगीचा अर्ज फेटाळला होता. 'सून जर सासऱ्याच्या मृत्यूनंतर विधवा झाली असेल, तर ती आश्रित ठरत नाही,' असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. 

न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती एस.व्ही.एन. भट्टी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, पतीचा मृत्यू सासऱ्याच्या आधी झाला की नंतर, यावरून सुनेचे हक्क बदलत नाहीत. दोन्ही परिस्थितीत सून ही 'आश्रित'च असते.

कलम २२ चा आधारसुप्रिम कोर्टाने मनुस्मृतीचा केवळ दाखला दिला आहे. परंतू, न्याय हा हिंदू दत्तक आणि भरण-पोषण कायदा, १९५६' च्या कलम २२ नुसारच दिला आहे. मृताच्या वारसांची ही कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी मृताच्या संपत्तीतून त्याच्या आश्रितांचा सांभाळ करावा, असे यात नमूद आहे. सुनेला पोटगी नाकारणे हे तिच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे (कलम २१) उल्लंघन आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

जर आम्ही विरोधात निकाल दिला तर या विधवा महिलेवर वाईट दिवस येतील, तिच्यावर अन्याय होईल. ती नीट जगू शकणार नाही आणि समाजात एकटी पडेल, असे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयामुळे लाखो विधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. सासऱ्याचे निधन आधी झाले व नंतर पतीचे निधन झाले तर ती महिला पोटगी मागू शकत नाही अशी आजवरचा समज होता, तो आता दूर झाला आहे.  

मनुस्मृतीचा संदर्भ काय...न्यायालयाने आपल्या निकालात मनुस्मृतीतील (अध्याय ८, श्लोक ३८९) संदर्भ दिला. त्यात म्हटले आहे की, "जे कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबातील हतबल महिलांचा किंवा सदस्यांचा सांभाळ करत नाहीत, ते दंडास पात्र आहेत." 

English
हिंदी सारांश
Web Title : Widow entitled to maintenance: Supreme Court cites Manusmriti.

Web Summary : Supreme Court rules widowed daughter-in-law entitled to maintenance from deceased father-in-law's property, referencing Manusmriti. The ruling clarifies that a widow's right to maintenance isn't affected by the timing of her husband's death relative to her father-in-law's, upholding her right to a dignified life.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय