शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

 ममता बॅनर्जींचे वादग्रस्त छायाचित्र शेअर केल्याप्रकरणी प्रियंका शर्मा यांना जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:43 IST

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त छायाचित्र प्रसिद्ध केल्याने अटक करण्यात आलेल्या भाजपा नेत्या प्रियंका शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

नवी दिल्ली -  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्य ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त छायाचित्र प्रसिद्ध केल्याने अटक करण्यात आलेल्या भाजपा नेत्या प्रियंका शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना प्रियंका शर्मा यांनी या प्रकरणी लेखी माफी मागावी, अशी अट ठेवली. नंतर त्यांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. मात्र निकाल सुनावल्यानंतर न्यायमूर्तींनी प्रियंका शर्मा यांच्या वकिलांना बोलावून सशर्त जामिनाची अट रद्द केली, तसेच प्रियंका शर्मा यांना तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले. प्रियंका शर्मा यांनी ममता बँनर्जींचे मॉर्फ केलेले एक आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, प्रियंकाच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या जामीन अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रियंका शर्मा यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी अट घातली. प्रियंका शर्मा या एका राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत. जर त्याना सामान्य नागरिक असत्या तर या प्रकरणी वेगळा अटला चालला असता, असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नमूद केले. अखेरीस लेखी माफी मागण्याच्या अटीवर प्रियंका यांना जामीन  मंजूर करण्यात आला. नंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सुधारणा करत सशर्त जामिनाची अट रद्द केली.दरम्यान, प्रियंका शर्मा यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या आई राजकुमारी शर्मा यांनी आनंद व्यक्त केला आहे. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता मला माझ्या मुलीच्या घरी परतण्याची प्रतीक्षा आहे, असे त्या म्हणाल्या. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाPoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019