शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 06:42 IST

दिल्लीत २५ मे रोजी, तर पंजाबमध्ये १ जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, या कालावधीसाठी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याविषयी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मागील सव्वा महिन्यापासून तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीत प्रचार करता यावा म्हणून अटी आणि शर्तींवर अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुकूलता दर्शविली. मात्र, त्यांच्या जामिनाला विरोध करणाऱ्या ईडीचा युक्तिवाद तब्बल साडेतीन तासांनंतरही अपूर्ण राहिल्याने ही सुनावणी गुरुवार, ९ मे किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडली. 

दिल्लीत २५ मे रोजी, तर पंजाबमध्ये १ जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, या कालावधीसाठी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याविषयी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. लोकसभा निवडणूक नसती, तर केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. निवडणूक पाच वर्षांतून एकदाच होते. ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. 

ऐन निवडणुकीपूर्वी अटक केली, हे म्हणण्याचा केजरीवाल यांना अधिकार आहे. ते सराईत गुन्हेगार नाही.  अंतरिम जामीन दिल्यास मुख्यमंत्री म्हणून ते कुठल्याही फाइलवर स्वाक्षरी करणार नाहीत, अशा भूमिकेसह न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांनी जामिनाच्या अटी निश्चित केल्या, तसेच जामिनावर मुक्त झाल्यास ते कुठल्याही फाइलवर स्वाक्षरी करणार नाही, पण उपराज्यपालांनी सरकारची कामे थांबवू नयेत, असे त्यांच्यावतीने  अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.

...तर अनिष्ट पायंडा पडेल : मेहताईडी आणि सीबीआयच्यावतीने साडेतीन तास युक्तिवाद करणारे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एस. व्ही. राजू आणि सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन प्रस्तावाचा जोरदार विरोध केला. 

केजरीवालांच्या वतीने दोन दिवस युक्तिवाद झाला, आम्हाला पण तेवढाच वेळ मिळावा. गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तीला वेगळी वागणूक दिली जाऊ नये. न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्याचा निर्णय घेतल्यास त्यामुळे अनिष्ट पायंडा पडू शकतो, असे तुषार मेहता म्हणाले. 

कोठडीत २० मेपर्यंत वाढसर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांच्या जामिनावर सुनावणी सुरू असतानाच आज राऊज ॲव्हेन्यूच्या पीएमएलए न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी केजरीवाल यांच्या तिहार तुरुंगातील ईडी कोठडीत २० मे पर्यंत वाढ केली. त्यांच्या कोठडीची मुदत आज संपली होती. ते १ एप्रिलपासून तिहार तुरुंगात ईडीच्या कोठडीत आहेत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४