शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Supreme Court: पुन्हा तारीख! शिंदे-शिवसेना वादातील 'सर्वोच्च' सुनावणी 10 दिवस लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:53 IST

Supreme Court: शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन सव्वा महिना लोटल्यानंतर अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला. त्यामुळे, आता सर्वांचेच लक्ष १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यालयातील सुनावणीकडे लागले होते. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा तब्बल १० दिवस पुढे ढकलली आहे. विशेष म्हणजे आजच शिवसेनेनं मुखपत्रातून शिंदे सरकावर टिका करताना मंत्रिमंडळ विस्तार ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे. 

शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या सत्ता संघर्षाचा पेच सुटत नसल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार होती. ती आता १२ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून ती आता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे, सध्याच्या मंत्र्यांना आणि भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे, असेच म्हणता येईल.

सरन्यायाधीश रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्याजागी उदय लळित हे सरन्यायधीशपदाची जबाबदारी स्विकारत आहेत. त्यामुळे, आता शिंदे विरुद्ध शिवसेना यांच्यातील न्यायालयीन लढाई रमण्णा यांच्या कोर्टात संपुष्टात येते की लळित यांच्यापर्यंत पोहोचते हे पाहावे लागेल.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे