शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणीदरम्यान वकिलाने सुप्रीम कोर्टात आणल्या व्हिस्कीच्या बाटल्या; जस्टिस चंद्रचूड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 14:42 IST

कोर्टात व्हिस्कीच्या बाटल्या पाहून सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड चकीत झाले.

Supreme Court Chief Justice: आपल्या निर्णयांमुळे आणि टिप्पण्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान चकीत झाले. शुक्रवारी (5 जानेवारी) दोन मद्य कंपन्यांमधील ट्रेडमार्क उल्लंघन प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी वकील मुकुल रोहतगी चक्क सरन्यायाधीशांसमोर व्हिस्कीच्या दोन बाटल्या घेऊन आले.

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातील अपीलावर सुनावणी सुरू होती. इंदूरस्थित कंपनी जेके एंटरप्रायझेसला 'लंडन प्राईड' नावाने शीतपेय तयार करण्यापासून रोखण्यासाठी मद्य कंपनी पेर्नोड रिकार्डचे अपील मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळले होते. या निर्णयाविरोधात पेर्नोड कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बाटली पाहून सीजेआय हसलेया प्रकरणी सुनावणी सुरू होताच पेर्नोड कंपनीचे वकील मुकुल रोहतगी यांनी खंडपीठाला विनंती केली की, कंपनीचे उत्पादन कोर्टात आणण्याची परवानगी द्यावी. परवानगी मिळताच त्यांनी कंपनीच्या दोन मद्य बाटल्या आणून टेबलावर ठेवल्या. हे असामान्य दृश्य पाहून न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्यासह सरन्यायाधीश चंद्रचूड मोठ्याने हसले. दोन उत्पादनांमधील साम्य दाखवण्यासाठी बाटल्या आणल्याचे रोहतगी यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाने हा निर्णय दिलाहे ऐकून सरन्यायाधीश म्हणाले, "येथे मुद्दा ट्रेड ड्रेसचा आहे. बॉम्बेमधील माझ्या एका निर्णयात या पैलूचा अंतर्भाव करण्यात आला आहे, ज्यामध्ये बाटलीच्या आकाराचा समावेश होता." रोहतगी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने नोटीस बजावली आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ​​दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवली. नोटीस बजावल्यानंतर रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना विचारले की, ते बाटल्या सोबत घेऊन जाऊ शकतात का? सरन्यायाधीश हसले आणि म्हणाले, हो जरूर.

काय आहे हा संपूर्ण वाद?गेल्या वर्षी मद्य कंपनी पेर्नोड रिकार्डने इंदूरस्थित जेके एंटरप्रायझेसला 'लंडन प्राइड' ट्रेडमार्क अंतर्गत अल्कोहोलयुक्त पेये तयार करण्यापासून रोखण्याचे आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पेर्नोर्ड रिकार्डने जेके एंटरप्रायजेसवर 'लंडन प्राइड' चिन्ह वापरून ग्राहकांना फसवल्याचा आरोप केला होता. पण, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. आता सुप्रीम कोर्टात याची सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडliquor banदारूबंदी