शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

जामीन हवा असेल तर राखी बांधून घे; 'तो' आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 21:30 IST

सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) एका याचिकेवर सुनावणी करताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवला आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दयाचिकाकर्त्यांनी आरोपीला जामीनासाठी ठेवण्यात आलेल्या अटीवर नोंदवला आक्षेपअ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांचे जामीनाच्या अटींवर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) एका याचिकेवर सुनावणी करताना मध्य प्रदेशउच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवला आहे. जामीन हवा असेल, तर राखी बांधून घे, असा निकाल एका लैंगिक शोषण प्रकरणात मध्य प्रदेशउच्च न्यायालयाने दिला होता. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी रद्द केला आहे. (supreme court cancels order of mp high court that the accused should get rakhi tied on his hand by the victim)

लैंगिक शोषण प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात नऊ महिला वकिलांनी याचिका दाखल केल्या होत्या. या चिकांवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणात रुढीवाद टाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्यांनी पीडितेला सहन कराव्या लागलेला त्रास क्षुल्लक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाल्याच्या मताशी सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. 

उज्जैनमधील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या विक्रम नावाच्या आरोपीशी हे प्रकरण संबंधित आहे. आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेचं लैंगिक शोषण केले होते. एप्रिल २०२० मध्ये त्याने जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये एक अट आरोपीने रक्षाबंधनला महिलेचा घरी जाऊन राखी बांधून घ्यावी, अशी होती. 

नऊ महिला वकील याचिकाकर्त्यांनी आरोपीला जामीनासाठी ठेवण्यात आलेल्या अटीवर आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणी १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने आरोपीच्या सुटकेवर स्थगिती आणली होती. यावेळी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी जामीनाच्या अटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी; राकेश टिकैत यांची मागणी

दरम्यान, आरोपीने न्यायालयात महिलेची सुरक्षा करण्याची शपथ घेत ११ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महिलेच्या मुलाला कपडे आणि मिठाईसाठी पाच हजार रुपये देण्याचा उल्लेख केला होता. न्यायालयाने यावेळी राखी बांधतानाचा फोटो न्यायालयात सादर करण्यास सांगितले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेशHigh Courtउच्च न्यायालय