शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील नेत्यांना सुप्रीम कोर्टाचाही दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:49 IST

तपास सुरुच राहणार : हायकोर्टाच्या निकालात हस्तक्षेप नाही

मुंबई : महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेतील (शिखर बँक) हजारो कोटी रुपयांच्या कथित घोटाळ््यात फौजदारी गुन्हा नोंदवून तपास करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणताही हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिल्याने यात आरोपी असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या अनेक नेत्यांना तसेच बँकेच्या माजी संचालकांना आणखी एक दणका मिळाला.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने हा तपास थांबणार नाही, हे स्पष्ट झाल्याने या नेतेमंडळींना आता येत्या काही दिवसांत अटक टाळण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.मुख्य म्हणजे एकूण ७० आरोपींपैकी काही मोजक्याच आरोपींनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला असला तरी त्याने इतरांचे दरवाजेही बंद झाले आहेत. वसंतराव नाथा शिंदे व आनंदराव अडसुळ (दोघे मुंबई), अमरसिंह शिवाजीराव पंडित (बीड), निलेश ऊर्फ बाळासाहेब सरनाईक (कोल्हापूर), दिलीपराव दगडू देशमुख (लातूर), सिद्धरामप्पा नागप्पा आलुरे व मधुकरराव देवराव चव्हाण (दोघेही उस्मानाबाद) आणि रामप्रसाद कदम बोर्डीकर (जिंतूर-परभणी) या बँकेच्या माजी संचालकांनी उच्च न्यायायालयाच्या २२ आॅगस्टच्या निकालाविरुद्ध विशेष अनुमती याचिका केल्या होत्या. या सर्व याचिका न्या. अरुण मिश्रा व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठापुढे सोमवारी प्रथमच सुनावणीस आल्या व त्या तडकाफडकी फेटाळल्या गेल्या.सुरु झालेला तपास थांबविणे इष्ट होणार नाहीयाचिकाकर्त्यांतर्फे विविध वकिलांनी अनेक मुद्दे मांडून उच्च न्यायालयाच्या निकालास निदान अंतरिम स्थगिती तरी द्यावी, अशी विनंती केली. मात्र ती अमान्य करताना खंडपीठाने सांगितले की, या घोटाळ््यातील रक्कम खूप मोठी असल्याने त्याचा इतक्या वर्षांनी सुरु झालेला तपास थांबविणे इष्ट होणार नाही. म्हणूनच उच्च न्यायालयाच्या आदेशात आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही. उच्च न्यायालयाने त्या निकालपत्रात नोंदविलेल्या निरीक्षणांनी प्रभावित न होता तपास पुढे सुरु ठेवला जावा.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrime Newsगुन्हेगारीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय