शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

नेत्याला तिकीट नाकारल्याने TMC कार्यकर्ते संतापले; कार्यालयाबाहेर केली तोडफोड अन् जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 6:54 PM

West Bengal Assembly Election 2021 And TMC : ममता दीदींच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या काही इच्छुक उमेदवारांची तिकिटं कापली गेली आहेत.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्व राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ममता दीदींच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या काही इच्छुक उमेदवारांची तिकिटं कापली गेली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक जण तिकीट कापल्यामुळे नाराज झाले आहेत. दक्षिण 24 परगणामधील भानगर भागातले पक्षाचे नेते अराबुल इस्लाम यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. नेत्याल तिकीट नाकारल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. कार्यकर्त्यांनी चक्क पक्ष कार्यालयातील सामानाची जाळपोळ केली आहे. कार्यालयातील लाकडी खुर्च्याची तोडफोड करून त्या भररस्त्यात जाळल्याची घटना समोर आली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपला निषेध व्यक्त केला आहे. 

"गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत", बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMCमध्ये प्रवेश

बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. टीएमसीचे महासचिव पार्थ चॅटर्जी, मंत्री सुब्रत चॅटर्जी आणि ब्रात्य बसु यांच्या उपस्थितीत सायंतिका यांनी पक्षात प्रवेश केला आहे. सायंतिका बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करताच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगालला केवळ ममता दीदी हव्या आहेत. "मला ही संधी दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे मनापासून आभार. मी आज अधिकृतरित्या TMC मध्ये प्रवेश केला. मात्र खरं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत आहे. हीच वेळ आहे मतदारांकडे आपलं भविष्य उज्वल करण्याची. बंगालला फक्त बंगालची मुलगी हवी आहे. बंगालला केवळ ममता बॅनर्जी हव्या आहेत" असं सायंतिका बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी (Bengali actor Srabanti Chatterjee) यांनी देखील राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चॅटर्जींनी भाजपात प्रवेश केला. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता भाजपाकडून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार की त्या स्टार प्रचारक म्हणून काम करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. श्राबंती चॅटर्जी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 

"...म्हणून मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे", श्राबंती चॅटर्जींनी व्यक्त केल्या भावना

"मला भाजपाची विचारधारा प्रभावित करते. मला पंतप्रधान मोदींचे व्हिजन प्रभावित करते" असं श्राबंती यांनी म्हटलं आहे. "मला तृणमूल काँग्रेसमधून कोणताही प्रस्ताव आला नाही. हा, मी दीदींचा (ममता बॅनर्जी) आदर करते. दीदींसोबत मी एकाच व्यासपीठावर राहिली आहे. त्यांच्यासोबत प्रचारसाठीही गेले आहे. पण मला भाजपाची विचारधारा प्रभावित करते. मला पंतप्रधान मोदींचे व्हिजन प्रभावित करते" असं श्राबंती चॅटर्जी यांनी म्हटलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षे डाव्या पक्षाने आणि 10 वर्ष तृणमूल काँग्रेसने सत्ता चालवली आहे. पण जितका विकास बंगालमध्ये व्हायला हवा होता, तितका तो झालेला नाही. मला वाटत आमच्या सोनार बांगलाचा विकास व्हायला हवा. त्यामुळे मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे" असं श्राबंती चॅटर्जी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका