‘आम्हाला साथ द्या, आम्ही हिंदू राष्ट्र बनवू’, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 07:04 IST2023-01-25T07:04:19+5:302023-01-25T07:04:50+5:30

आपली वक्तव्ये आणि चमत्कारांचे कथित दावे प्रकरणामुळे चर्चेत आलेले बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Support us we will make a Hindu nation the statement of Baba Dhirendra Shastri of Bageshwar Dham | ‘आम्हाला साथ द्या, आम्ही हिंदू राष्ट्र बनवू’, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

‘आम्हाला साथ द्या, आम्ही हिंदू राष्ट्र बनवू’, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

रायपूर :

आपली वक्तव्ये आणि चमत्कारांचे कथित दावे प्रकरणामुळे चर्चेत आलेले बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.   

पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी असा नारा दिला होता की, ‘तुम मुझे खून दो और मैं तुम्हें आझादी दुंगा.’ आता त्यांच्याप्रमाणेच माझा एक नारा आहे. ‘तुम हमारा साथ दो, हम हिंदू राष्ट्र बनाएंगे.’

ते म्हणाले की, केवळ बागेश्वर धामवरच आरोप करण्यात आलेले नाहीत. तर एक प्रकारे संपूर्ण हिंदू धर्माकडे बोट दाखविण्याचा प्रकार आहे. देशातील नागरिकांनी याचे उत्तर द्यायला हवे. या देशात असा कोणताच महापुरुष झाला नाही ज्यांच्यावर आरोप झाले नाहीत. लोक मला विचारतात की, बाबा तुम्ही काय चमत्कार करता. अशा सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की, आज देशातील हिंदू लोक एकत्र आले आहेत, हाच मोठा चमत्कार आहे. आपण कधीही राजकारणात जाणार नाही आणि नवीन पक्षही स्थापन करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Support us we will make a Hindu nation the statement of Baba Dhirendra Shastri of Bageshwar Dham