शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

एनआरसीला शिया वक्फ बोर्डाचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 06:46 IST

भारतीय मुस्लिमांना धोका नाही; मूळ प्रश्न घुसखोरांना ओळखण्याचा

लखनौ : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्सच्या (एनआरसी) अंमलबजावणीला उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डने (यूपीएससीडब्ल्यूबी) गुरुवारी पाठिंबा दिला. भारतीय मुस्लिमांना त्यापासून काहीही धोका नाही, असे बोर्डाने म्हटले. ‘एनआरसीपासून हिंदुस्थानी मुस्लिमांना काहीही धोका नाही. देशात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मूळ प्रश्न आहे तो घुसखोरांंना ओळखण्याचा. देशाला खरा धोका आहे तो घुसखोरांचा’, असे बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी म्हटले.

घुसखोर हे समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेससाठी मतपेट्या आहेत. काँग्रेस बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून घुसलेल्यांचे मतदार ओळखपत्रे बनवत आहे. जर एनआरसीची अंमलबजावणी झाली तर खरा चेहरा उघडा पडेल, असे वसीम रिझवी म्हणाले. एनआरसी आणि नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या (सीएए) नियोजित अंमलबजावणीविरोधात देशभर निषेध होत असताना रिझवी यांनी वरील भूमिका स्पष्ट केली. आसाममध्ये २४ मार्च, १९७१ रोजी किंवा त्या आधीपासून राहत असलेल्या अस्सल भारतीय नागरिकांना तसेच बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांना शोधण्यासाठी एनआरसी राबवले गेले. ३.३ कोटी अर्जांपैकी १९ लाख लोकांना गेल्या ३० आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आसामच्या अंतिम एनआरसीतून वगळण्यात आले आहे.रिझवी ठामपणे म्हणाले की, ‘इतर देशांतून हिंदू भारतात येतात ते तेथे होत असलेल्या अत्याचारांमुळे, तर मुस्लिम येतात ते त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी किंवा मग भारताला दुखापत करण्यासाठी.’ फक्त भारतीय मुस्लिम हे हिंदुस्थानी असून उर्वरित हे घुसखोर असून त्यांनी देश सोडून जायला पाहिजे, असे सांगून वसीम रिझवी यांनी सीएएच्या विरोधात नुकत्याच झालेल्या संघर्षाचा उल्लेख तो एक ‘कटाचा’ भाग असल्याचे म्हटले. डावे पक्ष करणार देशव्यापी निषेधच्डावे पक्ष नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए), नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर) आणि नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्सचा (एनआरसी) एक ते सात जानेवारीपर्यंत देशभर निषेध करणार आहेत. ही घोषणा गुरुवारी माकप, भाकप, भाकप (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)-लिबरेशन, आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टीने संयुक्त निवेदनात केली. आठ जानेवारी रोजी सार्वत्रिक संपही केला जाणार आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslimमुस्लीमIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश