चीनचा दहशतवादी मसूद अझरला पाठिंबा
By Admin | Updated: December 30, 2016 18:11 IST2016-12-30T18:11:48+5:302016-12-30T18:11:48+5:30
पठाणकोट तळावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव पुन्हा एकदा चीनने रोखला.

चीनचा दहशतवादी मसूद अझरला पाठिंबा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट तळावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव पुन्हा एकदा चीनने रोखला. चीनच्या विरोधामुळे संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. चीनची भूमिका आश्चर्यकारक आहे.
स्वत: चीन दहशतवादाच्या झळा सोसत आहे. यावरुन दहशतवाद विरोधी लढाईतील चीनचा दुटप्पीपणा दिसून येतो अशी टीका भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी केली. मसूद अझर सारख्या दहशतवाद्यांना जेरीस आणण्यासाठी भारत उपलब्ध पर्यायांचा वापर करत राहील असे विकास स्वरुप यांनी सांगितले.
एनएसजी देशांच्या गटात भारताचा समावेश आणि मसूद अझरसंबंधी भारताने दाखल केलेल्या प्रस्तावावर चीनच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही असे मागच्याच आठवडया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले होते.