बळीराजाला ‘आधार’ : लघुउद्योजकतेला बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:47 AM2020-06-02T06:47:03+5:302020-06-02T06:47:17+5:30

शेतीमालाच्या किमान किमतींत वाढ : लघू, मध्यम उद्योगांची व्याख्या व्यापक

'Support' to Baliraja: Strength for small entrepreneurship | बळीराजाला ‘आधार’ : लघुउद्योजकतेला बळ

बळीराजाला ‘आधार’ : लघुउद्योजकतेला बळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी १४ खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत उत्पादन खर्चाच्या किमान ५० टक्क्यांहून जास्त परतावा मिळेल अशा स्वरूपाची वाढ केली आहे. ही वाढ २०२०-२१ या वर्षासाठी आहे. भाताच्या किमतीत किरकोळ ५३ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ते ११६८ रुपये करण्यात आले आहे, तर तेलबिया, डाळी आणि भरड धान्ये यांच्या किमतीत भरीव वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट ‘एमएसपी’ देण्याचा वादा लागोपाठ दुसऱ्या वर्षी पूर्ण केल्याचा दावा सरकारने केला.
नगदी पिकांमध्ये कापसाच्या किमान आधारभूत किमतीत मध्यम धाग्याच्या जातीच्या कापसाच्या किमतीत प्रतिक्विंटल २६० रुपये वाढ करून ती ५,५१५ करण्यात आली आहे, तर लांब धाग्याच्या कापसाच्या दरात २७५ रुपये वाढ करून

रण्यात येईल, असे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. प्रतिक्विंटल ५,८२५ रुपये करण्यात आली आहे. याचबरोबर सरकारने तीन लाख रुपयांचे कृषी आणि संबंधित कामासाठी घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाच्या परतफेडीला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार मंत्रिमंडळाने २०२०-२०२१ साठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या. उत्पादन खर्चापेक्षा त्या ५० ते ८३ टक्के जादा परतावा देणाºया आहेत, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. याद्वारे केंद्र सरकारने २०१८-२०१९ मध्ये कृषिमालाला दीडपट भाव देण्याच्या केलेल्या घोषणेला अनुसरून या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत.
नाचणीच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल १४५ रुपये वाढ करून ती ३२९५ रुपये करण्यात आली आहे. मक्याची किंमत प्रतिक्विंटल ९० रुपयांनी वाढवून ती १८५० करण्यात आली आहे. ज्वारीच्या दरात ७० रुपयांनी वाढ केल्यामुळे हायब्रीड ज्वारीची किंमत प्रतिक्विंटल २६२०, तर मालदंडी ज्वारीच्या २६४० रुपये झाली आहे. बाजरीचा दर १५० रुपये वाढ करून २१५० रुपये प्रतिकिवंटल करण्यात आला आहे. बाजरीच्या दरातील वाढ ही उत्पादन खर्चाच्या ८३ टक्के जादा आहे.
उडीद दरात प्रतिक्विंटल ३०० रुपये वाढ करून ती सहा हजार करण्यात आली आहे, तर तुरीच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ करून तोही प्रतिक्विंटल सहा हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. मूग दरात १४६ रुपये वाढ करून तो प्रतिक्विंटल ७१९६ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
खाद्यतेलाच्या आयात कमी करण्यासाठी सरकारने तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीत यंदा भरीव वाढ केली आहे. सोयाबीन (पिवळा) १७० रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ३८८० रुपये, सुर्यफूल २३५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ५८८५ रुपये तर भूईमूग १८५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ५२७५ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे, तर करडईच्या दरात ७५५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ६६९५ रुपये रुपये करण्यात आला आहे. तीळाच्या दरात ३७० रुपये वाढ करून तो ६८५५ रुपये करण्यात आला आहे.
सरकारच्या म्हणण्यांनुसार शेतकऱ्यांना या १४ पिकांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपटीहून अधिक परतावा मिळणार आहे. सर्वाधिक बाजरी ८३ टक्के, उडिद ६४ टक्के, मका ५३ टक्के तर उर्वरित पिकांना ५० टक्के जादा दर मिळणार आहे.

Web Title: 'Support' to Baliraja: Strength for small entrepreneurship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.