शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

लॉकडाऊन काळात ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक वस्तू विकता येणार नाही, गृह मंत्रालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 14:04 IST

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संपूर्ण जगात हाहाकार घालत आहे. भारतातही कोरोना व्हायरसने हातपाय पसरले आहेत.  या संकटात जनतेला ...

ठळक मुद्देसरकारने 20 एप्रिलपासून काही सेवा आणि कामे सुरू करण्याची परवानगी दिली आहेही कामे जेथे कोरोना पोहोचलेला नाही अथवा जेथे कोरोनाचा प्रभाव अत्यंत कमी आहे, अशाच ठिकाणी सुरू होणार आहेतलॉकडाऊनच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तूंशिवाय इतर कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची विक्री करता येणार नाही

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संपूर्ण जगात हाहाकार घालत आहे. भारतातही कोरोना व्हायरसने हातपाय पसरले आहेत.  या संकटात जनतेला होणारा त्रास काही प्रमाणात कमी करण्यासाठी सरकारने 20 एप्रिलपासून काही सेवा आणि कामे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र हे कामकाज, जेथे कोरोना पोहोचलेला नाही अथवा जेथे कोरोनाचा प्रभाव अत्यंत कमी आहे, अशाच ठिकाणी सुरू होणार आहे. सरकारने शनिवारी या कामांची आणि सेवांची नवी यादी जारी केली. तसेच कोरोना संक्रमित भागांत, अशी कामे सुरू करण्याची परवानगी नसेल, असेही स्पष्ट केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गृह मंत्रालयाने रविवारी गाइडलाइन्समध्ये काही बदल केला आहे. यानुसार आता लॉकडाऊनच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तूंशिवाय इतर कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची विक्री करता येणार नाही.

केंद्र सरकारने सूट दिलेल्या कामांत आयुषसह आरोग्य सेवा, कृषी, मत्स्य व्यवसाय (समुद्रात आणि आंतर्देशीय), जास्तीत जास्त 50 टक्के कामगारांसह वृक्षारोपणाची कामे (चहा, कॉफी आणि रबर), पशुपालन, मनरेगांतर्गत कामे, मात्र, यात सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. तसेच वीज, पाणी आणि गॅस या आवश्यक सेवांचा समावेश आहे.  

राज्यांदरम्यान आणि राज्यांमध्ये वस्तूंची वाहतूक करण्याला परवानगी देण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रातही कामकाज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारांची कार्यालयेही 20 एप्रिलपासून खुली केली जातील.

या यादीत आर्थिक आणि सामाजिक क्षेत्र, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासारख्या खासजी संस्था, छोट्या लॉज आदींचा समाशदेखील करण्यात आला आहे. तसेच या कामकाजाला मंतुरी देण्याचा उद्देश जनतेला होणारा त्रास कमी करणे असा आहे. मात्र, दिलेल्या सूचनांचे पालन केले गेले तरच या कामांना परवानगी असेल, असेही सरकारने म्हटले आहे. याशिवाय सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कार्यालये, कामकाजाचे ठिकाण आणि कारखान्यांत आवश्यक गाईडलाईन्स निश्चित करण्याचे निर्देशही दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतHome Ministryगृह मंत्रालयNarendra Modiनरेंद्र मोदी