शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुपरमून, चंद्रग्रहण एकाच दिवशी पाहण्याची पर्वणी, चक्रीवादळामुळे अनेकांचा झाला हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 06:39 IST

Supermoon: सुपरमून, ब्लडमून आणि पूर्ण चंद्रग्रहण हे तिन्ही ‘खगोलीय चमत्कार’ एकाचवेळी पाहायला मिळाले. गेल्या सहा वर्षांत सुपरमून आणि पूर्ण चंद्रग्रहण या घटना एकाच वेळी झालेल्या नाहीत.

मुंबई : या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने जगभरातील नागरिकांना बुधवारी सुपरमूनचे दर्शन घेता आले. खगोलप्रेमींसाठी बुधवारचा दिवस खास होता, कारण सुपरमून, ब्लडमून आणि पूर्ण चंद्रग्रहण हे तिन्ही ‘खगोलीय चमत्कार’ एकाचवेळी पाहायला मिळाले. गेल्या सहा वर्षांत सुपरमून आणि पूर्ण चंद्रग्रहण या घटना एकाच वेळी झालेल्या नाहीत.भारतात दुपारी ३.१५ वा. सुरु झालेले चंद्रग्रहण लोकांना सायंका‌ळी ६.२३ पर्यंत पाहता आले. यातील १४ मिनिटे पूर्ण चंद्रग्रहण पाहता आले. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताघालता पृथ्वी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये ही ग्रहणाची स्थिती निर्माण होते. पूर्व आशियातील देश, ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिकेतील काही भागातील लोकांना पूर्ण चंद्रग्रहण पाहता आले. आकाशातील ढगांमुळे अमेरिकेतही लोकांना हे चंद्रग्रहण नीटपणे दिसू शकले नाही.पूर्वेकडील राज्यांमध्ये काही भागात, पश्चिम बंगालचा काही भाग तसेच ओडिशाचा काही भाग, अंदमान-निकोबार बेटांवर काही वेळासाठी लोकांना पूर्ण चंद्रग्रहण पाहता आले. हा परिसर वगळता देशाच्या अधिकांश भागात या चंद्रग्रहणाचे दर्शन होऊ शकले नाही. पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांमध्ये घोंघावत अससेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता फार कमी होती. ‌(वृत्तसंस्था) 

ढगाळ वातावरणामुळे अडथळेमुंबईकरांना सुपरमूनचे दर्शन घेता यावे, यासाठी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रातर्फे ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु ढगाळ हवामानाने अडथळे आणले. विज्ञान केंद्राचा कार्यक्रम बुधवारी रात्री ८.३० वाजता सुरू झाला; पण विज्ञानप्रेमींना ऑनलाइन पद्धतीनेही सुपरमूनचे दर्शन घेता आले नाही.

टॅग्स :Supermoonसुपरमून