सुपर व्होट पानासाठी : आदर्श आचारसंहिता

By Admin | Updated: January 14, 2017 00:06 IST2017-01-14T00:06:28+5:302017-01-14T00:06:28+5:30

(प्रातिनिधिक फोटो वापरावा -वोटिंग मशीन)

Super voter page: Model Code of Conduct | सुपर व्होट पानासाठी : आदर्श आचारसंहिता

सुपर व्होट पानासाठी : आदर्श आचारसंहिता

(प
्रातिनिधिक फोटो वापरावा -वोटिंग मशीन)
..........................................................
सुपर व्होट पानासाठी : आदर्श आचारसंहिता
...........................................................
आचारसंहिता म्हणजे काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नि:पक्षपाती, निर्भय वातावरणात व मुक्तपणे पार पडाव्यात, तसेच सत्ताधारी पक्षाच्या व सत्तेत नसलेल्या पक्षाचे उमेदवार यांना समान पातळीवर वाव मिळावा या हेतूने आचारसंहिता अस्तित्वात आली. विविध कायद्यांमधील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाच्या विविध सूचना म्हणजे आदर्श आचारसंहिता होय. ही आदर्श आचारसंहिता राजकीय पक्षांच्या तसेच उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आहे. आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्षांनी खासकरून सत्ताधारी पक्षाने पालन करणे बंधनकारक आहे. सर्वसामान्य नागरिक व मतदारांनीदेखील या संहितेतील तत्त्वांचा आदर करणे, तत्त्वांचे पालन करणे अपेक्षित आहे.
...........................................................
राज्य निवडणूक आयोगाची आचारसंहितेतील भूमिका काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि निवडणुका स्वच्छ, पारदर्शक, मोकळ्या व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहेत. यात प्रामुख्याने निवडणुकीच्या मैदानात असलेले उमेदवार संविधानातील कर्तव्ये पार पाडत आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्ष तसेच अन्य राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचे पालन होत आहे का? याची खात्री करून शासकीय यंत्रणेचा निवडणुकीच्या प्रयोजनासाठी गैरवापर होणार नाही, याची खात्री करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे अधिकार आयोगाला आहेत. तसेच तोतयेगिरी, लाचखोरी व मतदारांना प्रलोभने दाखविणे, मतदारांना धमक्या देणे व धाकदपटशा दाखवणे यांसारखे निवडणूकविषयक अपराध, गैरव्यवहार व भ्रष्ट प्रथांना प्रतिबंध करण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याचेही अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहेत.
(स्रोत : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग)
...........................................................

Web Title: Super voter page: Model Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.