शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Sunrise Over Ayodhya : रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार - सलमान खुर्शीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 22:15 IST

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी नुकतंच आपलं पुस्तक Sunrise over Ayodhya हे प्रकाशित केलं.

Sunrise over Ayodhya Salman Khurshid : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी नुकतंच आपलं पुस्तक 'Sunrise over Ayodhya' हे प्रकाशित केलं. यानंतर त्यांच्या पुस्तकातील काही भाग चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सलमान खुर्शीद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसंच निर्णयातील सकारात्मक गोष्टी पाहत आता देश या वादातून पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

"जे व्हायचं ते होऊन गेलं. हा निकाल आपल्याला एक संधी देत आहे ती आपल्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती कायमसाठी संपवून टाकावी. या निकालाचे तेच प्रयत्न आहेत," असं सलमान खुर्शीद म्हणाले. आजतकशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाबाबत अनेक पैलूंवर आपले विचारही व्यक्त केले.

"सार्वजनिक जीवनात देवाण-घेवाणीची स्थिती कायम असते," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पुस्तकातील एक भाग 'सॅफ्रन स्काय' याबाबत सुरु झालेल्या वादावरही आपलं मत व्यक्त केलं. "ज्यांना Hinduism माहित नाही ते लोक यावर प्रतिक्रिया देतील, ज्यांना त्याची माहिती आहे ते प्रतिक्रिया देणार नाहीत. ज्यांना हिंदू धर्म, इस्लाम माहित नाही त्यांची वाद काय घालायचा?," असंही त्यांनी नमूद केलं. रामराज्यवर बोलताना त्यांनी हा एक व्यापक विचार आहे आणि या चॅप्टरमध्ये हिंदू धर्माबबत वक्तव्य केलं गेलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

'...तो एक व्यापक विचार'"रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार आहे. जसं रामराज्य आहे तसंच जर तुम्ही इस्लामकडे पाहिलं तर त्यामुळे निजाम-ए-मुस्तफाबद्दल सांगण्यात आलं आहे, हे अगदी तसंच आहे. एकच विचार आहे, एकच मार्ग आहे. आपण केवळ शब्दांमध्ये अडकून राहू नये, यासाठी आम्ही खऱ्यापर्यंत पोहोचू शकू इतकं या पुस्तक कामी यावं," असंही खुर्शीद यांनी नमूद केलं. 

"६ डिसेंबर १९९२ रोजी जे काही घडलं ते चुकीचं होतं. ही अशी घटना होती ज्यानं संविधानाला बदनाम केलं. दोन समुदायांमध्ये एक दरी निर्माण झाली. हे चुकीचं होतं. मी १०० वेळा सांगेन हे चुकीचं होतं. जवळपास ३०० जणांना मुक्त करण्यात आलं, जसं कोणी जेसिकाला मारलं नाही, तसंच बाबरी मशीद कोणी उद्ध्वस्त केली नाही," असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पुस्तकाच्या प्रकाशादरम्यान केलं.

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय