गोदापार्कच्या कामावर संक्रांत हरित न्यायाधिकरण: लाल मातीच्या विटांचा वापर थांबवणार
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:24+5:302015-02-08T00:19:24+5:30
नाशिक- कोणत्याही बांधकामांसाठी राखेच्या विटांचाच वापर करावा, असे आदेश देऊनही राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कमध्ये थेट लाल विटांचाच वापर होत आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि मुकेश अंबाणी यांच्यासारख्या बड्या लोकांवर कारवाई होऊ शकते काय या विषयी थेट याचिकाकर्त्यांनी शंका उपलब्ध केली, परंतु पाटबंधारे खात्याला यासंदर्भात त्वरित दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश हरित न्यायाधिकरण करण्याने दिले आहेत.

गोदापार्कच्या कामावर संक्रांत हरित न्यायाधिकरण: लाल मातीच्या विटांचा वापर थांबवणार
न शिक- कोणत्याही बांधकामांसाठी राखेच्या विटांचाच वापर करावा, असे आदेश देऊनही राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कमध्ये थेट लाल विटांचाच वापर होत आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि मुकेश अंबाणी यांच्यासारख्या बड्या लोकांवर कारवाई होऊ शकते काय या विषयी थेट याचिकाकर्त्यांनी शंका उपलब्ध केली, परंतु पाटबंधारे खात्याला यासंदर्भात त्वरित दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश हरित न्यायाधिकरण करण्याने दिले आहेत. नाशिक फ्लाय ब्रीक्स असोसिएशनच्या वतीने पुण्याच्या हरित न्यायाधिकरणात दाखल याचिकेवर यापूर्वीच निकाल देण्यात आला आहे. त्यानुसार राखेच्या विटा तयार होणार्या परिसराच्या शंभर किलो मीटर परिघात लाल मातीच्या विटांऐवजी राखेच्या विटा वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रशासनाच्या वने आणि पर्यावरण विभागाने तसा निर्णय यापूर्वी २००१ मध्ये घेतला आहे. तथापि, तरीही नाशिकमध्ये राखेच्या विटांऐवजी लाल विटांचा वापर होत आहे. यासंदर्भात हरित न्यायाधिकरणात दाखल अवमान याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाच्या निदर्शनास गोदापार्कच्या कामासाठी अशाच प्रकारे लाल मातीच्या विटा वापरल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर कारवाई करणे कसे शक्य आहे, असा प्रश्न करण्यात आला. तथापि, न्यायाधिकरणाने पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भात त्वरित पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे आता लाल मातीच्या विटांचा वापर थांबला नाही, तर याचिकाकर्ता पुन्हा जिल्हाधिकार्यांवर कारवाईसाठी याचिका दाखल करू शकतात, असेही न्यायालयाने सांगत अवमान याचिका निकाली काढली.