शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sunil Jakhar joins BJP: काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांचा भाजपमध्ये प्रवेश, नरेंद्र मोदींचे केले तोंडभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:03 IST

Sunil Jakhar joins BJP: दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुनील जाखड यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून दिले.

Sunil Jakhar joins BJP:काँग्रेसलापंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. पंजाबकाँग्रेसचे ज्येष्ठ हिंदू नेते सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना दिल्लीत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व मिळवून दिले. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरुन जाखड यांना सर्व पदांवरून हटवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. 

    

काँग्रेसशी त्यांचा दीर्घकाळ संबंध होताजाखड यांचे कुटुंब जवळपास 50 वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. सध्या त्यांचे तिसर्‍या पिढीतील पुतणे संदीप जाखड काँग्रेसचे आमदार  आहेत. यावेळी भावूक होऊन सुनील जाखड म्हणाले की, 'माझा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसशी संबंध होता. मी तीन पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये राहिलो. धर्म, जात आदी आधारावर पंजाबचे विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळेच हे जुने नाते तोडण्याचा निर्णय घेतला,' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

भाजपमध्ये सामील होण्याचे कारण सांगितले

सुनील जाखड म्हणाले की, 'संसदेव्यतिरिक्त पंजाबमध्ये मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन झाले, त्यावेळी पंतप्रधानांच्या जवळ बसून लंगर घालण्याचे भाग्य लाभले. तिथे त्यांच्याशी चांगला संवाद झाला. पंजाबला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, हे माझे स्वप्न आहे. व्यावहारिकदृष्ट्या पंतप्रधान मोदींनी पंजाबला विशेष दर्जा दिला आहे. पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने गुरु साहिबांचे प्रकाश पर्व साजरे केले त्यावरून ते सिद्ध झाले,' असेही ते म्हणाले.

जेपी नड्डा यांनी केले स्वागत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, सुनील जाखड यांनी आज भाजपचे सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या आणि भाजपच्या करोडो कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. पंजाबमध्ये राष्ट्रवादी शक्तींचे पहिले स्थान भाजप घेत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी विचार असलेल्या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्ष मजबूत करणे आवश्यक आहे.

काँग्रेसचा राजीनामा दिला होतापक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपावरून गेल्या महिन्यात काँग्रेसमधील सर्व पदांवरून हटवण्यात आलेले जाखड़ यांनी 14 मे रोजी फेसबुकच्या माध्यमातून 'गुड लक आणि गुडबाय काँग्रेस' असे म्हटले होते. काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर करताना, त्यांनी दिल्लीत बसलेल्या काही नेत्यांवर, विशेषत: अंबिका सोनी यांच्यावर हल्ला केला होता. जोपर्यंत काँग्रेस अशा नेत्यांपासून मुक्त होत नाही तोपर्यंत ते पंजाबमध्ये आपला जनाधार निर्माण करू शकत नाही, असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPunjabपंजाबJ P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदी