सण्डे स्टोरी पुणे- मिल्कट्रेन भागवू शकते मनमाडची तहान

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:37+5:302015-09-03T23:05:37+5:30

टंचाई निवारण: मिल्कट्रेनने ३० लाख लिटर पाणी आणणे शक्य

Sunder Story Pune- MilkTrain can run Manmad's thirst | सण्डे स्टोरी पुणे- मिल्कट्रेन भागवू शकते मनमाडची तहान

सण्डे स्टोरी पुणे- मिल्कट्रेन भागवू शकते मनमाडची तहान

चाई निवारण: मिल्कट्रेनने ३० लाख लिटर पाणी आणणे शक्य

मनोहर बोडखे /दौंड :
उत्तरप्रदेशमध्ये दूध घेऊन जाणार्‍या मिल्कट्रेनमध्ये परतीच्या प्रवासात पाणी आणून नाशिक जिल्‘ातील मनमाडसारख्या मोठ्या गावांची तहान भागविता येऊ शकते, अशी कल्पना जाणकारांकडून पुढे आली आहे. राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दौंड (जि. पुणे) येथून महिन्यातून पाच वेळा मिल्कट्रेन उत्तरप्रदेश राज्यातील होडल या गावी दूध घेऊन जाते. दीड हजार किलोमीटरच्या या प्रवासासाठी गाडीला ३६ तास लागतात. गाडीला १५ डबे असून प्रत्येक डब्यात ४० हजार याप्रमाणे एकूण सहा लाख लिटर दूध ही गाडी एका फेरीत नेते.
दौंड, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झाशी, आग्रा, मथुरा, होडल असा या गाडीचा मार्ग आहे. यासाठीचा खर्च नॅशनल डेअरी करते. जाताना दूध घेऊन जाणारी ही रेल्वे येताना मात्र रिकामीच येते. हे एकप्रकारचे राष्ट्रीय नुकसानच आहे. त्यामुळे या रिकाम्या गाडीचा वापर पाण्याच्या वाहतुकीसाठी करता येऊ शकतो. या मार्गावरील मनमाड व इतर अनेक गावांत पाणी टंचाई आहे. रेल्वे ज्या मार्गाने परत येते त्या राज्यांमधून पाणी आणून मनमाडसारख्या गावांना देता येईल. एका खेपेला सहा लाख लिटर, असे महिन्याला ३० लाख लिटर पाणी यातून उपलब्ध होईल.
कायम स्वरुपी दुष्काळाच्या छायेत असणार्‍या मनमाडला १५ दिवसानंतर एकदा पाणी मिळते. येथील पाणी टंचाईबाबत शासनही हतबल आहे. रेल्वे यावर पर्याय ठरु शकते.

................

तर पाण्याचा भार हलका होईल
दौंड ते होडल या दरम्यान मिल्कट्रेन महिन्यात पाच वेळा धावते. परतीच्या प्रवासात पाच खेपांपैैकी दोन खेपा रेल्वेमार्गावरील इतर गावांना व तीन खेपा मनमाडला दिल्या तर पाणीप्रश्न सुटेल. रेल्वे मनमाड स्थानकावर आल्यानंतर नगरपरिषद हे पाणी टँकरद्वारे दुष्काळी परिसराला पोहोचवू शकते.

................

मिल्कट्रेनमध्ये सुविधा
दूध खराब होऊ नये म्हणून मिल्कट्रेनच्या प्रत्येक डब्यात अंतर्गत थर्मास सिस्टीम आहे. त्यामुळे दौंड ते होडल या ३६ तासांच्या प्रवासात दूध खराब होत नाही. दूध खाली केल्यानंतर सदरचे डबे स्वच्छ करुन त्यात पाणी भरणे शक्य आहे. रेल्वे प्रशासनाशी बोलून राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकते.

..............
मनमाडकरांसाठी वाळवंटातील झरा !
महिन्याला ३० लाख लिटर पाणी मिळाले, तर वाळवंटात झरा सापडल्यासारखे होईल. मात्र, ही योजना रेल्वेच्या सहकार्यावर अवलंबून आहे. मनमाड नगर परिषद या प्रस्तावासाठी रेल्वेला सहकार्य करण्यास तयार आहे.
- बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष, मनमाड.


फोटो ओळ : दौंड ते होडल धावणारी मिल्कट्रेन
02092015-िं४ल्लि-25

Web Title: Sunder Story Pune- MilkTrain can run Manmad's thirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.