संडे पान 4, 5 फोंड्यात पुन्हा पदपथावर अतिक्रमण?
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:03+5:302015-03-08T00:31:03+5:30
फोंडा : वरचाबाजार, फोंडा भागातील पदपथ विक्रेत्यांपासून मोकळे केल्यामुळे पादचारी तूर्त खुश झालेले असले तरी शनिवारी परत विक्रे त्यांनी वरचाबाजार, तसेच जुना बसस्थानकावरील फुटपाथवर अतिक्रमण केल्याचे दिसून आले. यामुळे मार्केटमधील विक्रेते त्यांना हाकलतानाचे चित्र पाहावयास मिळाले.

संडे पान 4, 5 फोंड्यात पुन्हा पदपथावर अतिक्रमण?
फ ंडा : वरचाबाजार, फोंडा भागातील पदपथ विक्रेत्यांपासून मोकळे केल्यामुळे पादचारी तूर्त खुश झालेले असले तरी शनिवारी परत विक्रे त्यांनी वरचाबाजार, तसेच जुना बसस्थानकावरील फुटपाथवर अतिक्रमण केल्याचे दिसून आले. यामुळे मार्केटमधील विक्रेते त्यांना हाकलतानाचे चित्र पाहावयास मिळाले.पदपथावरील व्यापार्यांना नुकतेच हटविल्याने बाजारात तणाव निर्माण झाला होता. विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण करू नये म्हणून पोलीस तैनात केले होते. पदपथ मोकळे झाल्याने वाहनचालकांना, तसेच पादचार्यांना सोयीचे झाले होते. गेले सात महिने फोंडा बाजार भागातील सोपो कराचा प्रश्न निर्माण झाला असून फोंडा पालिकेने आता नव्याने सोपोकर लिलाव घेण्याचा ठराव पालिका बैठकीत घेतल्यामुळे या वादाला तोंड फुटले आहे. मार्केटातील रस्त्यावर विक्रेते बसत असल्याने आत मार्केटमधील विक्रेत्यांना ग्राहक मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.आता पदपथावरील विक्रेत्यांना हटविल्याने बाजारातील विक्रेते खुश झाले असले तरी शनिवारी वरचाबाजार तसेच जुना बसस्थानकावरील फुटपाथवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले. दरम्यान, जुन्या बसस्थानकाजवळील पार्किंगच्या जागेवर फळविक्रेत्यांनी छत्र्या लावल्याने त्या रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण होत असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. ही जागा दुचाकी पार्किंगसाठी आहे. पालिकेने यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.(प्रतिनिधी)