भारताचे पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स
By Admin | Updated: July 26, 2014 02:28 IST2014-07-26T02:28:01+5:302014-07-26T02:28:01+5:30
पाकमध्ये सुरू खटल्याची सुनावणी वारंवार स्थगित करण्यात येत असल्याबद्दल भारत सरकारने आज पाक उपउच्चायुक्तांना बोलावून तीव्र नाराजी व्यक्त केली.

भारताचे पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स
नवी दिल्ली / इस्लामाबाद : 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकमध्ये सुरू खटल्याची सुनावणी वारंवार स्थगित करण्यात येत असल्याबद्दल भारत सरकारने आज पाक उपउच्चायुक्तांना बोलावून तीव्र नाराजी व्यक्त केली.
एकीकडे परराष्ट्र मंत्रलयाने पाक उपउच्चायुक्ताला समन्स बजावले, तर दुसरीकडे पाकिस्तानातील भारतीय उपउच्चायुक्त इस्लामाबादेत पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात गेले आणि अशाचप्रकारे नाराजी व्यक्त केली.
नवी दिल्ली आणि इस्लामाबादेत पाकिस्तानी अधिका:यांशी झालेल्या बैठकीत भारतीय अधिका:यांनी खटल्याची प्रगती आणि पाकिस्तानी अधिकारी करीत असलेल्या तपासाचा नियमित अहवाल मागितला.
2क्क्8 च्या मुंबई हल्लाप्रकरणी पाकिस्तानने त्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वाना आरोपीच्या पिंज:यात उभे करावे, असा पुनरुच्चार भारतीय अधिका:यांनी बैठकीत केला. या हल्ल्यात 166 नागरिक ठार आणि शेकडो जखमी झाले होते. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाची कारवाई बुधवारी सलग सातव्यांदा स्थगित झाली. मुंबई हल्लाप्रकरणी सात आरोपींविरुद्ध या न्यायालयात खटला सुरू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्मुंबई हल्लाप्रकरणी पाकिस्तानात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी सलग सातवेळा स्थगित झाली आहे. सरकारी वकील सुरक्षेच्या कारणांमुळे 28 मे, 4 जून, 18 जून आणि 2 जुलैला रावळपिंडी न्यायालयातील सुनावणीला हजर नव्हते.