शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

सारांश

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

शारदाप्रकरणी मतंगसिंह

शारदाप्रकरणी मतंगसिंह
यांच्या मदतनीसाची चौकशी
कोलकाता : शारदा घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)बुधवारी माजी केंद्रीय मंत्री मतंगसिंह यांचे मदतनीस ख्याती सदाना यांची चौकशी केली़
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतंगसिंह आणि शारदा समूहाचे मालक सुदीप्त सेन यांच्यातील आर्थिक व्यवहार आणि घोटाळ्यातील त्यांचा सहभाग याबाबत सदाना यांना प्रश्न विचारण्यात आले़ सुमारे दीड तास ही चौकशी झाली़ मतंगसिंह सध्या सीबीआय कोठडीत आहेत़

राज्यसभा खासदार
मनोरमा शर्मा यांचे निधन
डेहराडून : उत्तराखंडातून राज्यसभेवर गेलेल्या काँग्रेस खासदार मनोरमा शर्मा डोबरयाल यांचे बुधवारी सकाळी दिल्लीनजीकच्या गुडगाव येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले़ त्या ५५ वर्षांच्या होत्या़ पाच दिवसांपूर्वी त्यांची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली होती़ शस्त्रक्रियेनंतरच काही समस्या उद्भवल्यानंतर त्यांची दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करावी लागली होती़ मंगळवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली़ गतवर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या़

प्राध्यापक व त्यांच्या
पत्नीवर गुंडांचा हल्ला
कानपूर : कानपूरमध्ये बुधवारी पहाटे अज्ञात गंुडांनी एक प्राध्यापक ओमप्रकाश व त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडून हल्ला केला़ या हल्ल्यात हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून मृत्यूशी झुंज देत आहे़ कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा कयास आहे़ गुंड सकाळी त्यांच्या घरात शिरले व त्यांनी दोघांवरही गोळ्या झाडल्या़ ओमप्रकाश यांच्या आई-वडिलांना मात्र त्यांनी काहीही केले नाही़

भारत-पाक सीमेवर
संशयित युवकास अटक
बिकानेर : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेनजीक सुरक्षा दलाने बुधवारी एका संशयित युवकास अटक केली़ त्याच्याकडून एक पिस्तूल आणि देशी दारू जप्त करण्यात आली़ एका गुप्त सूचनेच्या आधारावर सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सुजावलपूर गावातून या युवकास अटक केली़ त्याचे नाव शिवकुमार अरोडा आहे़

ट्रक-कारची धडक
चौघांचा मृत्यू
हाथरस (उप्र) : हाथरस जिल्ह्याच्या बहता बम्बा भागात बुधवारी कार व ट्रकच्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले़ एका वळणावर ट्रकने कारला समोरून जबर धडक दिली़ कारमध्ये नऊ जण होते़ यापैकी चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला़ ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे़

तीन अल्पवयीन
मुलांकडून शस्त्र जप्त
मुरैना (मप्र) : तीन अल्पवयीन मुलांकडून पोलिसांनी बुधवारी एक रिव्हॉल्व्हर, दोन देशीकट्टे आणि काडतुसे जप्त केली़ आगऱ्यातील एका शस्त्रास्त्र तस्करांच्या टोळीशी या मुलांचा संबंध असल्याचे चौकशीतून समोर आले आहे़ यापैकी दोघे १७ वर्षे वयाची तर एक १६ वर्षांचा आहे़

विक्की त्यागी हत्येप्रकरणी
एक जण ताब्यात
मुजफ्फरनगर : गँगस्टर विक्की त्यागी याच्या कथित हत्येप्रकरणी पोलिसांनी बुधवारी एका व्यक्तीस ताब्यात घेतले़ यादरम्यान त्यागीची आई प्रभा त्यागी यांनी स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याने या प्रकरणाची वरिष्ठ तपास संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे़ वकिलाच्या पोशाखात आलेल्या एका अल्पवयीन मारेकऱ्याने गत १६ फेबु्रवारीला विक्की त्यागीची गोळ्या घालून हत्या केली होती़