शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"ओडिशा अपघातातील पीडितांसाठी माझे १० कोटींचे दान स्वीकारा", सुकेशचे रेल्वेमंत्र्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 19:20 IST

Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २९० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. २९० नागरिकांना या भीषण अपघातात आपला जीव गमवावा लागला. या अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. अशातच दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ओडिशा रेल्वे अपघातातील पीडितांसाठी १० कोटी रुपयांचे दान स्वीकारण्याची विनंती केली आहे. 

२ जून रोजी झालेल्या अपघातात २९० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. शुक्रवारी लिहिलेल्या पत्रात सुकेशने म्हटले की, हे योगदान माझ्या वैयक्तिक निधीतून देत आहे, जे माझ्या कमाईच्या स्रोतातून आले आहे. १० कोटी रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसोबत रिटर्न फायलिंग आणि इतर कागदपत्रेही दिली जातील. सुकेशने आपल्या वकिलामार्फत जारी केलेल्या पत्रात लिहिले, "हा एक दुर्दैवी अपघात असून त्यामुळे मी पूर्णपणे तुटलो आहे. मागील काही दिवसांपासून या घटनेने मी व्यथित आहे. या दुर्घटनेत ज्यांच्या जवळच्या व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत क्लेशदायक आहे."

सुकेशचे रेल्वेमंत्र्यांना आवाहन तसेच आपले सरकार सर्व बाधितांना सर्व आवश्यक गोष्टी पुरवत आहेच पण मी एक जबाबदार आणि चांगला नागरिक म्हणून ज्या कुटुंबांनी आपले कमावते प्रियजन गमावले आहेत. त्यांच्यासाठी आर्थिक मदत करू इच्छित आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मी १० कोटी रुपयांचे योगदान देत आहे. हे योगदान केवळ मृत कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जावे, असे सुकेशने पत्रात लिहले.

२९० जण दगावले२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २९० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.  

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातDeathमृत्यूAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे