शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Sukesh Chandrasekhar : दीड लाखांची चप्पल अन् 80 हजाराच्या दोन जीन्स! सुकेशच्या सेलमध्ये छापा, अधिकाऱ्यांसमोर रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 12:41 IST

Sukesh Chandrasekhar : या छाप्यादरम्यान सुकेश चंद्रशेखर तुरुंग अधिकाऱ्यांसमोर रडताना दिसला.

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने सुकेशच्या सेलवर छापा टाकला. यावेळी तुरुंग अधिकाऱ्यांनी सुकेशच्या सेलमधून दीड लाख रुपये किमतीची गुच्ची चप्पल आणि 80 हजार रुपये किमतीच्या दोन जीन्स जप्त केल्या आहेत. या छाप्यादरम्यान सुकेश चंद्रशेखर तुरुंग अधिकाऱ्यांसमोर रडताना दिसला.

या छाप्याचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील तिहारमधील मंडोली तुरुंगातील असल्याचा दावा केला जात आहे. याठिकाणी तुरुंगातील सुरक्षा कर्मचारी सुकेशच्या सेलमध्ये तपासणी करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंग अधिकाऱ्यांनी सुकेशच्या सेलमध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूची तपासणी केली. यादरम्यान पोलीस अधिकारी दीपक शर्मा आणि जयसिंग त्याच्या सेलमध्ये पोहोचताच तो रडू लागला.

सुकेशने सरकारी अधिकारी बनून केली होती फसवणूक सरकारी अधिकारी बनून लोकांची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सुकेशवर आहे. याचबरोबर, सुकेश चंद्रशेखरने वरिष्ठ न्यायाधीश म्हणून स्वत: सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांना फोन केले होते. सुकेशला फोनवरून दबाव निर्माण करून निर्णय आपल्या बाजूने लिहून घ्यायचा होता. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचेही नाव सुकेशसोबत जोडले गेले.

या प्रकरणी जॅकलिनवरही आरोपसुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिनवरही आरोप केले होते. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने जॅकलिनला आरोपी बनवले आहे. दुसरीकडे जॅकलिन या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचा दावा करत आहे. जॅकलिनने सांगितले होते की, सुकेश तिला शूटिंगच्या आधी सकाळी फोन करायचा. त्यानंतर दुपारी एखदा कॉल आणि रात्री झोपण्यापूर्वी एक कॉल करत होता. दरम्यान, सुकेशने तो तुरुंगातून फोन करतोय किंवा तुरुंगात आहे, हे कधीच सांगितले नव्हते, असेही जॅकलिन म्हणाली होती. या दोघांमधील शेवटचे संभाषण 8 ऑगस्ट 2021 रोजी झाले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिस