शहरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्त्या

By Admin | Updated: June 23, 2016 00:06 IST2016-06-22T22:03:28+5:302016-06-23T00:06:50+5:30

नाशिक : शहरातील एका महिलेसह युवकाने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाट्याजवळ राहणार्‍या आफरीन रफिक खाटीक (२३) या महिलेने मंगळवारी (दि़२१) मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेतला़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी बिटको रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Suicide by taking both of the men in city | शहरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्त्या

शहरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्त्या

नाशिक : शहरातील एका महिलेसह युवकाने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाट्याजवळ राहणार्‍या आफरीन रफिक खाटीक (२३) या महिलेने मंगळवारी (दि़२१) मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेतला़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी बिटको रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
आत्महत्त्येची दुसरी घटना सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे घडली असून कैलास सुखलाल पवार (३२) या युवकाने राहत्या घरी गळफास घेतल्याचे बुधवारी (दि़ २२) सकाळच्या सुमारास उघडकीस आले़ त्याच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide by taking both of the men in city